Donald Trump : ट्रम्पच्या सल्लागाराने पुन्हा ओकली भारताविरोधात आग, रशियाकडून तेल खरेदीवरून साधला निशाणा, म्हणाले..

भारत फक्त नफ्यासाठी रशियन तेल खरेदी करतोय आणि त्यातून मिळणारा महसूल रशियन युद्धयंत्रणेला पोसतो. ज्यामुळे युक्रेनियन आणि रशियन लोक मारले जातात. अमेरिकन करदात्यांना जास्त पैसे द्यावे लागतात

Donald Trump : ट्रम्पच्या सल्लागाराने पुन्हा ओकली भारताविरोधात आग, रशियाकडून तेल खरेदीवरून साधला निशाणा, म्हणाले..
| Updated on: Sep 09, 2025 | 8:33 AM

अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफच्या मुद्यावरून दोन्ही देशांत वातावरण प्रचंड तापलेलं आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिका भारतावर चिडली आहे तर त्यांनी लावलेलं टॅरिफ हे चुकीचं आणि अन्याय्य असल्याचे सांगत भारताने भूमिका कायम ठेवत झुकण्यास नकार दिला आहे. मात्र यामुले दोन्दी देशांमध्ये तणावाचे वातावरण असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री, इतर नेते मात्र भारतावर सतत आगपाखड करत नाराजी दर्शवत आहेत. खुद्द ट्रम्प हेच कित्येकदा त्यांची भूमिका बदलतात, कधी भारतावर रोष दाखवतात तर कधी पंत्परधान मोदींचे कौतुक करत त्यांना मित्र म्हणतात. तर दुसरीकडे ट्रम्प यांच्या मंत्रीमंडळातील नेते, मंत्री हे मात्र भारताबद्दल सातत्याने द्वेषपूर्ण विधाने करताना दिसतात.

त्याचचं एक ताज उदारहण म्हणजे डोनाल्ड ट्रंप यांचे ॲडव्हायजर अर्थात सल्लागार पीटर नवारो यांनी भारताबद्दल पुन्हा गरळ ओकली आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल त्यांनी परत एकदा भारतावर निशाणा साधला आहे. रशियाकडून तेल खरेदी करून भारत, युक्रेन युद्धाला प्रोत्साहन देत आहे, असा घणाघाती आरोप नवारो यांनी केला आहे. यापूर्वीही त्यांनी भारतावर टीका केली होती. तर आता त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहीत भारतावर टीका केली. ‘युक्रेनवरील हल्ल्यापूर्वी भारत रशियाकडून तेल खरेदी करत नव्हता, परंतु आता ते मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे. हा ब्लड मनी आहे आणि लोकं मरत आहेत’ असे म्हणत नवारो यांनी आगपाखड केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार असलेले पीटर नवारो यांनी आधीही द्वेषपूर्ण विधानं केलेली आहेत. सोमवारी त्यांनी त्याची पुनरावृत्ती करत भारतावर टीकास्त्र सोडत भारताने रशियन तेल खरेदी करणे म्हणजे ब्लड मनी असल्याची टिपण्णी केली. रशिया -युक्रेनदरम्यान संघर्श पेटला नव्हता, त्यावेळी भारताने मॉस्कोकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केले नव्हते असेही ते म्हणाले.

नवारोची भारतावर पुन्हा आगपाखड

X वरील त्यांच्या पोस्टमध्ये, नवारो म्हणाले की, ‘ हे खरं आहे की, रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी भारताने मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी केले नव्हते. हा ब्लड मनी आहे आणि लोक मरतायत. ‘ गेल्या आठवड्यात देखील नवारो यांनी एक पोस्ट केली होती , त्यात त्यांनी असा दावा केला हता की भारताने लादलेल्या सर्वाधिक टॅरिफमुळे अमेरिकन नोकऱ्या मारत आहेत.

फक्त फायद्यासाठी तेल खरेदी

भारत फक्त नफ्यासाठी रशियन तेल खरेदी करतोय आणि त्यातून मिळणारा महसूल रशियन युद्धयंत्रणेला पोसतो. ज्यामुळे युक्रेनियन आणि रशियन लोक मारले जातात. अमेरिकन करदात्यांना जास्त पैसे द्यावे लागतात. भारत सत्य आणि खोटेपणा सहन करू शकत नाही असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर जेव्हा एक्सने नवारोच्या पोस्टमध्ये एक कम्युनिटी नोट जोडली तेव्हा त्यांनी एलन मस्कवर टीका केली. एक्सचा अब्जाधीश मालक लोकांच्या पोस्टमध्ये दुष्प्रचार करत आहे. खाली दिलेली ती नोट याचाच पुराव आहे, असे ते म्हणाले होते.

भारत फक्त नफा कमावण्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करतोय. रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी त्यांनी (भारताने) कोणतेही तेल खरेदी केले नव्हते. भारत सरकारची प्रचार यंत्रणा पूर्ण वेगाने चालू आहे. युक्रेनियन लोकांना मारणे थांबवा. अमेरिकन नोकऱ्या हिरावून घेणे थांबवा अशी मागणीही त्यांनी केली होती.

रशियाकडून तेल खरेदी करण्याचा भारताचा सार्वभौम निर्णय

त्याच वेळी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ने नवारोच्या एका पोस्टची तथ्य तपासणी केली होती आणि ती ढोंगी असल्याचे म्हटले होते. X च्या फॅक्ट चेक नोटमध्ये म्हटले गोते की रशियाकडून तेल खरेदी करण्याचा भारताचा निर्णय हा कायदेशीर आणि सार्वभौम निर्णय आहे. तो आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन मानला जाऊ शकत नाही. हे पाऊल भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या गरजेशी जोडलेले होते. मात्र,नवारोने या फॅक्ट चेकवरही जोरदार टिप्पणी केली. ती निरुपयोगी टीप असल्याचे ते म्हणाले होते. दुष्प्रचार चालवल्याचा आरोपही त्यांनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केला.