
अमेरिकेसाठी बिझनेस आधी येतो, मैत्री नंतर. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावून अमेरिकेने हे दाखवून दिलय. रणनितीक हितापेक्षा व्यापार त्यांच्यासाठी जास्त महत्वाचा आहे. रणनितीक दृष्टीकोनातून चीनला रोखण्यासाठी अमेरिकेने भारताला बळकट करणं गरजेच आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी बिझनेस जास्त महत्वाचा आहे. म्हणून त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. आता इस्रायलच्या बाबतीतही अमेरिका हेच करत आहे. आखातामध्ये सौदी अरेबिया हा अमेरिकेचा विश्वासू मित्र आहे. अमेरिका आता आपल्या या मित्राची ताकद वाढवणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला जगातील सर्वात घातक फायटर जेट F-35 विकायला परवानगी दिली आहे. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान सोमवारी अमेरिकेत दाखल झाले. त्यावेळी ही घोषणा झाली.
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर मध्यपूर्वेच्या राजकारणात घडामोडी वाढल्या आहेत. सर्वात जास्त टेन्शन इस्रायलमध्ये आहे. आतापर्यंत या भागात फक्त इस्रायलकडे स्टेल्थ फायटर जेट्स होते. पण आता सौदी अरेबियाला हे घातक फायटर विमान मिळणार आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये अस्वस्थतता आहे. F-35 हे सामान्य फायटर विमानं नाही. हे जगातील अत्याधुनिक, हायटेक फायटर जेट आहे. अमेरिकेतील Lockheed Martin कंपनीने या विमानाची निर्मिती केली आहे. हे स्टेल्थ जेट आहे. शत्रुचं रडार हे विमान पकडू शकत नाही. हवेत उड्डाणवस्थेत असताना हे विमान अदृश्य असतं. F-35 चा टॉप स्पीड Mach 1.6 आहे.
F-35 हे साधसुध विमान नाही
मध्य पूर्वेत आतापर्यंत फक्त इस्रायलकडे F-35 विमानं होतं. सौदी अरेबियाचे अनेक वर्षांपासून हे विमान मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. इस्रायलला भिती ही आहे की, सौदीला हे विमान मिळताच आकाशातील त्यांचं वर्चस्व कमी होईल. अमेरिकेने 2008 साली एक कायदा बनवला. त्यानुसार कुठल्याही शस्त्रास्त्र व्यवहारामुळे इस्रायलचं सैन्य वर्चस्व कमी नाही झालं पाहिजे. F-35 सौदीला विकण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे इस्रायलमधील संरक्षण संस्थांची चिंता वाढली आहे. इस्रायली एअर फोर्सने या बद्दल एक औपचारिक पत्र सरकारला दिलं आहे. सौदीच्या पश्चिमेच्या एअर बसेवरुन F-35 ने उड्डाण केलं, तर ते काही मिनिटात इस्रायलच्या सीमेपर्यंत पोहोचू शकतात ही भिती आहे. म्हणून इस्रायल अमेरिकेला विनंती करणार आहे की, सौदी अरेबियाला F-35 विमानांची विक्री करणार असाल, तर पश्चिमी एअर बेसवर त्याची तैनाती करु नका. F-35 हे साधसुध विमान नाही. आजच्या घडीला जगातील हे सर्वात शक्तीशाली जेट आहे.