AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत या 12 देशातील नागरिकांना ‘नो एन्ट्री’, 7 देशातील नागरिकांबाबतही…

अमेरिकेने १२ देशातील नागरिकांना नो एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकेत या 12 देशातील नागरिकांना 'नो एन्ट्री', 7 देशातील नागरिकांबाबतही...
Donald TrumpImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Jun 05, 2025 | 7:35 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आता १२ देशांच्या नागरिकांचा अमेरिकेत प्रवेशावर पूर्ण बंदी आणली आहे. तसेच इतर ७ देशांमधून येणाऱ्या लोकांवर अंशतः निर्बंध घातले आहेत. या नवीन निर्णयावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करत ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे. यासंदर्भातील वृत्त सीबीएस न्यूजने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.

कोणत्या देशांवर बंदी

अमेरिकेत आता अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, इक्वेटोरियल गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन यासह १२ देशांच्या नागरिकांना प्रवेश करण्यास बंदी असणार आहे. या देशांचे नागरिक आता अमेरिकेत प्रवेश करू शकणार नाहीत. तसेच ७ देशांमधून येणाऱ्या लोकांवरही बंदी घातली आहे. यामध्ये बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला यांचा समावेश आहे. या देशांमधून येणाऱ्या लोकांवर काही अटी आणि कडक तपासणीनंतर अमेरिकेत प्रवेश मिळणार आहे.

ट्रम्प यांनी काय म्हटले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे की, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे. अमेरिकन नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मला हे पाऊल उचलावे लागले आहे. आम्ही पुन्हा प्रवास बंदी लागू करू, त्याला काही लोक ‘ट्रम्प ट्रॅव्हल बॅन’ म्हणतात. यामुळे कट्टरपंथी इस्लामिक दहशतवाद्यांना देशात प्रवेश करण्यापासून रोखता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा हा निर्णय योग्य ठरवला होता.

व्हाइट हाउसकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही देशांवर पूर्ण तर काही देशांवर अंशतः निर्बंध आणले आहे. ज्या देशातील नागरिक सुरक्षा तपासणीत अयशस्वी ठरले, त्यांच्याबाबत हा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेसाठी गंभीर धोका निर्माण करणाऱ्या देशातील नागरिकांसाठी हा निर्णय घेतला गेला. ट्रम्प यांनी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळातही काही देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घातली होती. त्यावेळी त्यांनी ७ मुस्लिम देश इराक, सीरिया, इराण, सुदान, लिबिया, सोमालिया, येमेन येथील नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.