गल्फ ऑफ अमेरिका, लेक अमेरिका… नंतर आता ‘या’ महासागरालाही स्वत:चं नाव देणार; डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यात नेमकं शिजतंय तरी काय?

Donald Trump Ocean Rename: नकाशावर अमेरिकेची छाप उमटवण्याचा डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत आहेत. आता महासागर आणि मोठ्या नदीचं नाव बदलण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

गल्फ ऑफ अमेरिका, लेक अमेरिका... नंतर आता या महासागरालाही स्वत:चं नाव देणार; डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यात नेमकं शिजतंय तरी काय?
| Updated on: Oct 11, 2026 | 4:25 PM

अमेरिकेतून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अटलांटिक किंवा पॅसिफिक महासागराचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी या महासागराला ‘ट्रम्प ओशन’ किंवा ‘ओशन ऑफ द अमेरिकाज’ असे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे सांगितले. १० ऑक्टोबर, शनिवारी टेनेसी येथील एका निवडणूक रॅलीदरम्यान ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आपल्याला एका महासागराची गरज आहे. यानंतर त्यांनी अटलांटिक किंवा पॅसिफिक महासागराचे नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवला. आपण त्याला ‘ट्रम्प ओशन’ किंवा ‘ओशन ऑफ द अमेरिकाज’ किंवा असेच काहीतरी म्हणू शकतो. यावेळी ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलून अमेरिकेचे आखात आणि ओंटारियो सरोवराचे नाव बदलून अमेरिका सरोवर करण्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयांचा उल्लेख केला.

Loading...

त्यांनी असेही म्हटले की, पद सोडण्यापूर्वी त्यांना एका महासागराचे आणि एका प्रमुख नदीचे नाव बदलायचे आहे. मी पद सोडण्यापूर्वी, मला वाटते की आपल्याकडे एक महासागर असावा. आपल्याला एका प्रमुख महारसागराची गरज आहे. ट्रम्प यांनी गेल्या वर्षी मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलून अमेरिकेचे आखात केले होते. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे मेक्सिकोसोबत तणाव निर्माण झाला होता. यामुळे असोसिएटेड प्रेससोबतही वाद निर्माण झाला, जेव्हा त्या वृत्तसंस्थेने नवीन नाव वापरण्यास नकार दिला.

यानंतर त्या एजन्सीला राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली. ज्यामुळे कायदेशीर वाद निर्माण झाला. गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी न्यू मेक्सिकोचे नाव बदलून ‘न्यू अमेरिका’ ठेवण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र नंतर त्यांनी सांगितले की यावर पुढे जायचे की नाही, याचा निर्णय राज्याच्या रहिवाशांवर अवलंबून असेल. न्यू मेक्सिकोमधील एका रिपब्लिकन काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या एका व्हिडिओमध्ये ते म्हणाले, “मी यासाठी आग्रह धरणार नाही, पण बऱ्याच लोकांना ही कल्पना खरोखरच आवडली आहे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us