भारतीय विद्यार्थ्यांच्या मुळावर डोनाल्ड ट्रम्प, ज्याची भीती तेच घडले, पार..
डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून व्हिसाच्या नियमात मोठे बदल करत आहेत. त्याचत त्यांच्या या बदलाचा परिणाम जगभरातील लोकांना बसत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून व्हिसाच्या नियमात मोठे बदल करत आहेत. अमेरिका फर्स्ट हे धोरण त्यांनी राबवले. व्हिसावरील शुल्क देखील वाढवले जात आहे. विदेशातून लोक अमेरिकेत येतात आणि नोकऱ्या करून पैसे कमावतात आणि आपल्या देशात पाठवतात, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा आरोप केला. यासोबतच कायमचे अमेरिकेत राहण्यासाठी मुलेही इथेच जन्माला घालतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून व्हिसाच्या नियमात बदल केले जात असतानाच F-1 विद्यार्थी व्हिसाधारकांना याचा मोठा फटका बसला. रिपोर्टनुसार, अमेरिकेत 2025 मध्ये भारतीय आणि चीन नागरिकांना मिळणाऱ्या व्हिसाची संख्या अत्यंत कमी आहे. 2024-25 मध्ये शैक्षणिक सत्रामध्ये 11,77,766 विद्यार्थी शिक्षणासाठी अमेरिकेत गेले होते.
भारताचे 3,63,019 आणि चीन 2,65,191 होते. पदवी पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेत विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळते. सीआयईएसच्या रिपोर्टनुसार, भारत आणि चीनच्या विद्यार्थ्यांची अमेरिकेत जाऊन शिक्षण घेण्याची संख्या घटली आहे. कारण त्यांना व्हिसाच मिळत नाही. अमेरिकेतील लोकांना काम मिळत नसल्याने विद्यार्थी व्हिसामध्येही मोठी कपात अमेरिकेने केली. कारण हे विद्यार्थी विद्यार्थी व्हिसावर जातात आणि तिथे पदवी घेतल्यानंतर काम करतात.
ज्यामुळे अमेरिकेतील लोकांना संधी मिळत नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे. आयईआईईच्या रिपोर्टनुसार, 2024-25 मध्ये 2,94,253 विद्यार्थी अमेरिकेत ओपीटीसह काम करत होते. त्यात भारताचे1,43,740 आणि चीनचे 61,981 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 2024 मध्ये ओपीटीच्या माध्यमातून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1,65,524 विदेशी विद्यार्थी म्हणजेच 68 टक्के भारत आणि चीनचे विद्यार्थी होते.
सीआयईएसचे म्हणणे आहे की, जर भारत आणि चीनच्या विद्यार्थ्यांची संख्या अशीच घटत राहिली तर त्याचा परिणाम काही दिवसांमध्येच दिसेल. रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी 22149 भारतीयांना F-1 व्हिसा देण्यात आला. गेल्या काही वर्षांचा विचार केला असता ही संख्या खूपच कमी आहे. 2024 मध्ये 58,694 विद्यार्थ्यांना व्हिसा मिळाल होता. डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय भारतीय विद्यार्थ्यांच्या मुळावर येताना दिसत आहे. अमेरिकेत जाऊन शिक्षण घेणे आता विद्यार्थ्यांसाठी दिवसेंदिवस कठीण होत आहे. ही अत्यंत धोक्याची घंटा आहे.