AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 टक्के टॅरिफपेक्षाही डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला मोठा झटका, थेट आदेश, म्हणाले 100 टक्के…

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने लावलेल्या 50 टक्के टॅरिफपेक्षाही हा मोठा झटका नक्कीच म्हणावा लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल युरोपला मोठे आवाहन केले. ज्यामुळे समस्या अधिक वाढण्याची शक्यता आहे.

50 टक्के टॅरिफपेक्षाही डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला मोठा झटका, थेट आदेश, म्हणाले 100 टक्के...
Donald Trump
| Updated on: Sep 11, 2025 | 10:12 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा जगासमोर येताना दिसत आहे. एकीकडे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक करत माझे जवळचे मित्र आहेत आणि राहणार असे म्हणताना दिसतायत. दुसरकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या विरोधात आग ओकल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच भारतावर 100 टक्के टॅरिफ लावा असे थेट आवाहनच युरोपला केलंय. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलाय. मात्र, हा टॅरिफ लावून अजून डोनाल्ड ट्रम्प यांचे पोट भरले नसून आता त्यांनी थेट 100 टक्के टॅरिफ लावण्याचे आवाहन युरोपला केले. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफचा मोठा फटका भारताला अगोदरच बसलाय. भारतातून अमेरिकेत होणारी तब्बल 70 टक्के निर्यात बंद झालीये.

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध भडकले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने रशियाला या युद्धासाठी मोठा पैसा मिळत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील शांतीचा मार्ग हा दिल्लीहून जातो. जर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले तर त्यांच्याकडे या युद्धासाठी पैसाच राहणार नाही. फक्त भारतच नाही तर यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर चीन देखील आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपला आवाहन करत म्हटले की, भारत आणि चीन या दोन्ही देशांवर 100 टक्के टॅरिफ लावा. मात्र, अमेरिकेने भारतावर जरी 50 टक्के टॅरिफ लावला असला तरीही त्यांनी चीनवर अजूनही कोणता टॅरिफ आकारला नाही. रशियाकडून भारतापेक्षाही अधिक तेल खरेदी करणारा देश चीन आहे. मात्र, पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या विरोधात भूमिका घेण्यास युरोपला सांगत आहेत. भारत तर त्यांच्या निशाण्यावर अगोदरपासूनच आहे.

भारताबद्दल फक्त डोनाल्ड ट्रम्प हेच नाही तर त्यांचे सहकारी देखील वादग्रस्त विधाने करत आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यास इच्छुक आहे, असे सांगणारेच डोनाल्ड ट्रम्प आता भारतावर 100 टक्के टॅरिफ लावण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. मात्र, यावर अजून भारताने काही भाष्य केले नाहीये. मात्र, मागील काही दिवसांपासून भारत हा देखील अमेरिकेला सडेतोड उत्तर देताना दिसत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...