
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका कधी बदलेले हे सांगणे अवघड आहे. एक आठवड्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प हे युक्रेन आणि रशियामधील युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न करत होते. दोन्ही देशांच्या नेत्यांची त्यांनी बैठक घेतली. शांततेत हे युद्ध संपले पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचे जगाला ओरडून सांगत होते. रशियासोबत युद्ध करण्यासाठी युक्रेनला अगोदर भडकवले, त्यांनी हवी ती मदत दिली आणि त्यानंतर युद्ध थांबवत असल्याचे दाखवले. एकीकडे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगून आता थेट युक्रेनला रशियावर हल्ला करण्याचे आदेश त्यांनी दिली आहेत. यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.
डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला रशियाच्याविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी, असे म्हटले. याबाबतची एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी म्हटले की, आक्रमक देशावर हल्ला केल्याशिवाय युद्ध जिंकणे खूप कठीण आहे. रशियन सैन्याने 574 ड्रोन आणि 40 क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी युक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अमेरिकी कंपनीला देखील टार्गेट बनवण्यात आले. तसेच युक्रेनची पाच शहरे देखील टार्गेटवर होती. यानंतर ट्रम्प संतापले.
रशियाने अमेरिकन कंपनी फ्लेक्सच्या कारखान्यावर क्षेपणास्त्र टाकली. ज्यामध्ये कंपनीचे मोठे नुकसान तर झालेच शिवाय 19 लोक गंभीर जखमी झाली. या कारखान्यात कॉफी मशीनसारख्या सामान्य घरगुती वस्तू तयार केल्या जातात. अमेरिकन कंपनीवर देखील हल्ला झाल्याने अमेरिका चवताळून उठल्याचे बघायला मिळत आहे. आता युक्रेन आणि रशियाच्या युद्धाबाबत अमेरिकेची भूमिका बदलल्याचे दिसत आहे.
रशिया आणि युक्रेनचे युद्ध थांबवण्यासाठी मोठा मलिदा मिळत असल्यानेच डोनाल्ड ट्रम्प हे मध्यस्थीची भूमिका घेत होते. हेच नाही तर युक्रेनकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी करण्याचा त्यांचा डाव होता, त्या बदल्यात युक्रेनला सुरक्षेची कमी अमेरिकेकडून दिली जात होती. अमेरिकेच्या या भूमिकेनंतर रशियाकडून अमेरिकेची कानउघडणी करत स्पष्ट म्हणण्यात आले की, रशियाच्या सहमतीशिवाय कोणतीही सुरक्षा हमी मिळणार आहे. त्यानंतर आता अमेरिकेची भूमिका बदलल्याचे स्पष्टपणे बघायला मिळत आहे. परत एकदा सिद्ध झाले की, अमेरिका आपल्या फायद्याशिवाय काहीच करत नाही.