जग हादरलं! तो भयंकर निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलाच, युद्धाचा भडका उडणार, थेट अमेरिकी लष्कर..

डोनाल्ड ट्रम्प एका मागून एक मोठे निर्णय घेताना दिसत आहेत. सध्या अमेरिका आणि इराणमधील तणाव प्रचंड वाढल्याचे बघायला मिळतंय. मात्र, त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाचे टेन्शन वाढवल्याचे बघायला मिळत आहेत.

जग हादरलं! तो भयंकर निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलाच, युद्धाचा भडका उडणार, थेट अमेरिकी लष्कर..
Donald Trump
| Updated on: Jan 23, 2026 | 7:55 AM

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे. अमेरिकेच्या धमकीला इराणकडूनही सडेतोड उत्तर दिले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट म्हटले होते की, इराणने छोटी जरी चूक आमच्याविरोधात केली किंवा करण्याचा प्रयत्न केला तरीही जगाच्या नकाशावर आम्ही इराणला मिटवून टाकू. यावर इराणने प्रतिउत्तर देत म्हटले, आमच्यावर अतिक्रमण किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न जरी डोनाल्ड ट्रम्प यांनी केला तर आम्ही हल्ला करणाऱ्याचे हात कापूच शिवाय संपूर्ण जग उद्धवस्थ करू. दोन्ही देशांमध्ये तणाव प्रचंड वाढला. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. अमेरिकेची एक चूक फक्त एका इराणसाठीच नाही तर जगासाठी महागात पडू शकते. इराणमध्ये लोक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली. मात्र, इराणकडून आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करण्यात आला. या आंदोलनात अमेरिकेने उडी घेतली आणि इराणच्या लोकांचा लढा शेवटच्या टप्प्यात असल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेच्या भूमिकेमुळे आंदोलन अधिकच चिघळताना दिसले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच सांगितले की, इराणच्या दिशेने एक मोठे लष्करी दल तैनात केले जात आहे. अमेरिकेच्या प्रत्येक हालचालीवर इराणचेही बारीक लक्ष आहे. अमेरिकेने कोणतीही कारवाई केली तर आम्ही देखील त्यांना त्यापेक्षा जास्त प्रतिउत्तर देऊ असे इराणने म्हटले. अमेरिकेचे लष्कर पुढे गेले आहे. मात्र, सध्याच कारवाई केली जाणार की नाही? याबद्दल अजून काही स्पष्ट कळू शकले नाहीये.

डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलताना म्हटले की, अमेरिकेने या प्रदेशात एक मोठा नौदल ताफा तैनात केला आहे, परंतू मला वाटत नाही की, त्याची फार जास्त गरज आहे. एक महत्त्वपूर्ण सैन्यदल इराणच्या दिशेने पुढे सरकत आहे. काहीही चुकीचे घडावे, असे मला वाटत नाही. मात्र, आम्ही प्रत्येक गोष्टीवर अगदी बारकाईने नजर ठेऊन नक्कीच आहोत.

डोनाल्ड ट्रम्प इराणच्या दिशेने आपले सैन्य पुढे सरकवताना दिसत आहेत. हा एकप्रकारे इराणला मोठा इशारा असू शकतो, असे बोलले जात आहे. अमेरिका आपले सैन्य पुढे नेत असल्याने जगाची चिंता वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे, हे कळू शकत नाही. मात्र, जर काही घडामोडी घडल्या तर युद्ध अधिक भडकू शकते, हे नक्की आहे.