मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या थेट त्या आदेशावर सह्या, उडाली खळबळ, जगाचे वाढले टेन्शन, आता…

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सध्याच्या घडीला जोरदार टीका होताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प हे कधी काय निर्णय घेतली हे सांगणे फार कठीण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला चांगले मित्र म्हणून थेट भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला. आता त्यांनी अजून एक मोठा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या थेट त्या आदेशावर सह्या, उडाली खळबळ, जगाचे वाढले टेन्शन, आता...
Donald Trump
| Updated on: Sep 06, 2025 | 7:58 AM

डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या कार्यकाळाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक चर्चेत आहेत. जगाला हादरवणारी काही निर्णय ते घेताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प कधी काय बोलतील आणि काय धमकावतील हे सांगणे फार जास्त कठीण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एका मोठ्या निर्णयावर सही केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रक्षा विभागाचे नाव बदलून युद्ध विभाग ठेवण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. फक्त निर्णयच नाही तर त्यांनी या आदेशावर सही देखील केली आहे. एका बड्या अधिकाऱ्यांने याबद्दलची महत्वाची माहिती दिली की, रक्षा विभागाचे नाव नेमके का बदलले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल बोलताना म्हटले की, आम्ही पहिले विश्वयुद्ध जिंकले, आम्ही दुसरेही विश्वयुद्ध जिंकलो, त्यादरम्यान आम्ही सर्वकाही जिंकले. त्यानंतर आम्ही काही मोठे बदल करण्याचा निर्णय घेत विभागाचे नाव बदलून रक्षा विभाग केले. 1947 मध्ये युद्ध विभागाचे नाव बदलून रक्षा विभाग ठेवण्यात आले होते, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून टीकेचे धनी ठरल्याचे बघायला मिळत आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी रक्षा विभागाचे नाव बदलून कोणते युद्ध जिंकायचे हा प्रश्न उपस्थित होतोय.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारत आणि अमेरिकेतील मागील काही वर्षांपासूनचे चांगले संंबंध अत्यंत वाईट झाले आहेत. हेच नाही तर दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा देखील बंद असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेतील व्यापार करार करणारी टीम ही भारताच्या दाैऱ्यावर होती. त्यांचा नियोजित दाैरा होता. मात्र, टॅरिफच्या तणावात तो दाैरा रद्द करण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प हे देखील भारतात येणार होते.

डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफच्या मुद्द्यावरून दुटप्पी भूमिका घेताना दिसत आहेत. फक्त भूमिकाच नाही तर ते भारताबद्दल अनेकदा वादग्रस्त विधाने करताना देखील दिसत आहेत. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण भारतावर टॅरिफ लावत असल्याचे खोटे कारण देताना डोनाल्ड ट्रम्प दिसत आहेत. मात्र, पाकिस्तानची वाढती जवळीकता आणि ट्रम्प कुटुंबियांचा पाकिस्तानमधील व्यापार यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर थेट टॅरिफ लावला आहे.