AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा मोठी धमकी, म्हणाले, फक्त दोन आठवडे, नाही तर…

टॅरिफचा वाद चिघळलेला असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा धमकी दिल्याचे बघायला मिळत आहे. हेच नाही तर त्यांनी भारत आणि पाकिस्तान युद्धाबाबत मोठा दावा परत एकदा केला आहे. आता डोनाल्ड ट्रम्प हे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा मोठी धमकी, म्हणाले, फक्त दोन आठवडे, नाही तर...
Donald Trump
| Updated on: Aug 23, 2025 | 8:13 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला असून सातत्याने खालच्या पातळीवर जाऊन अमेरिकेकडून भारतावर टीका केली जात आहे. आता परत एकदा मोठी धमकी देण्यात आली आहे. टॅरिफचा मुद्दा तापलेला असतानाच आता परत एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून रशिया आणि युक्रेनच्या युद्धाबाबत मोठे भाष्य करण्यात आलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, प्रतिबंध लावून काही होणार नाहीये. मी पुढच्या दोन आठवड्यात याबद्दल अत्यंत मोठा निर्णय घेणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी यादरम्यान म्हटले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्रपती वलोदिमीर जेलेंस्की या दोघांनी एकत्र बसून चर्चा करावी. जर यांनी असे केले नाही तर मला बघावे लागेल असे का होत नाही. पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, युक्रेनमधील अमेरिकेच्या एका कारखान्यावर रशियाने हल्ला केला, त्याचा मी निषेध करतो. मी सात युद्ध रोकले आहेत आणि तीन युद्ध टाळली आहेत. पुढच्या दोन आठवड्यात मी मोठा निर्णय घेणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी परत एकदा भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाबाबत भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, भारत आणि अमेरिकेत परमाणू युद्ध होणार होते, ते मी टाळले आहे. भारताकडून वेळोवेळी सांगण्यात आले की, या युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा काही हस्तक्षेप नव्हता. भारत आणि पाकिस्तानच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी बैठकीमधून निर्णय घेऊन हे युद्ध थांबवले आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी आता परत याबद्दल दावा केला आहे.

युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियाचे विदेश मंत्री सर्गेई लावरोव यांनी जाहिर केले की, पुतिन हे जेलेंस्की यांना भेटण्यास तयार आहेत. आता युक्रेन देखील पुतिन यांच्यासोबतच्या भेटीला तयार होते का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. जर या दोघांमध्ये भेट झाली नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये भारतावर सतत गंभीर आरोप हे अमेरिकेकडून केली जात आहेत.

Follow Us
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण