तर मी अमेरिकन लष्कर पाठवेल… डोनाल्ड ट्रम्प यांची आतापर्यंतची सर्वात मोठी धमकी, म्हणाले, ते एक..

डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एक अत्यंत मोठी धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीने अमेरिकेत चांगलीच खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील काही देशांवर मोठा टॅरिफ लावल्याने काही देश अडचणीत सापडली आहेत.

तर मी अमेरिकन लष्कर पाठवेल... डोनाल्ड ट्रम्प यांची आतापर्यंतची सर्वात मोठी धमकी, म्हणाले, ते एक..
Donald Trump American troop
| Updated on: Oct 20, 2025 | 7:59 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकीकडे जगातील युद्धे रोखण्याचा दावा करत आहेत तर दुसरीकडे काही देशांना थेट धमक्या देत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांची दुटप्पी भूमिका अगोदरच जगापुढे आलीये. आता थेट त्यांनी अमेरिकेचे सैन्य पाठवण्याची मोठी धमकी दिली. यामुळे जगात मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी एका मुलाखतीत सॅन फ्रान्सिस्कोला सैन्य पाठवण्याची धमकी दिली. डेमोक्रॅट्सच्या नियंत्रणाखाली असलेल्या शहरांमध्ये अमेरिकन लष्करी दलांची तैनाती वाढवायची असल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. ट्रम्प यांनी या अगोदरच लॉस एंजेलिस, वॉशिंग्टन आणि मेम्फिस येथे नॅशनल गार्ड पाठवले आहेत, ज्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसतोय.

काही भागात डोनाल्ड ट्रम्प यांना रोखत कोर्टांनी नॅशनल गार्ड शहरात तैनात करण्यास स्पष्ट नकार दिला. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलताना ट्रम्प यांनी म्हटले की, आता आपण सॅन फ्रान्सिस्कोला जात आहोत, फरक एवढाच आहे, तिथल्या लोकांना आपण हवे आहोत असे मला वाटते. ते एक सुंदर शहर आहे आणि तिथल्या लोकांना आपण हवे आहोत. गेल्या 15 वर्षांमध्ये तिथे खूप जास्त चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत.

आपण तिथे जाऊ आणि ते पुन्हा एकदा चांगले शहर बनू. ते एक सुंदर ठिकाणी नक्कीच आहे. शहरांमध्ये लष्करी तैनातीचे समर्थन करण्यासाठी ट्रम्प यांनी शहरांमधील कमी गुन्हेगारी अधिक वाढून सांगितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना शहरांमध्ये नॅशनल गार्ड तैनात करायचे असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ज्याला लोक मोठ्या संख्येने विरोध करत असून यामध्ये कोर्टाने देखील हस्तक्षेप घेतलाय.

गेल्या महिन्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचक विधान करत म्हटले की, अमेरिकन शहरे लष्करी प्रशिक्षण केंद्र म्हणून वापरली जाऊ शकतात. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंसक निदर्शनांनंतर जूनमध्ये लॉस एंजेलिसमध्ये नॅशनल गार्ड पाठवण्यात आले. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी त्यावेळी ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयावर जोरदार टीका केली होती. आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.