मोठी बातमी! या देशाच्या पंतप्रधानांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठा अपमान, थेट नकार देत..

डोनाल्ड ट्रम्प यांनी बोर्ड ऑफ पीसचा प्रस्ताव अनेक देशांना पाठवला. मात्र, भारतासह चीनसारख्या देशांनी याकडे पाठ फिरवली. आता यावरून मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

मोठी बातमी! या देशाच्या पंतप्रधानांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठा अपमान, थेट नकार देत..
Donald Trump
| Updated on: Jan 23, 2026 | 9:44 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. बोर्ड ऑफ पीसमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला पाठवला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी थेट निमंत्रण मागे घेतले.अमेरिकेने हे निमंत्रण मागे घेण्याचे कारणही तेवढे मोठे आहे. कार्नी यांनी दावोस येथे भाषणात थेट काही प्रश्न उपस्थित केले होते, त्यामध्ये वैश्विक महाशक्तींना त्यांनी थेट मोठा इशारा दिला होता. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली नाराजी जाहीर केली. डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप इतका जास्त वाढला की, त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रिय प्रधानमंत्री कार्नी बोर्ड ऑफ पीस कॅनडा सहभागी होण्याबाबत दिलेले निमंत्रण मागे घेत आहे. प्रतिष्ठित नेत्यांचा बोर्ड होणार असल्याचेही यादरम्यान त्यांनी म्हटले.

दावोसमधील कार्नी यांचे भाषण सध्या तूफान चर्चेत आहे. महाशक्तींविरोधात मध्यम शक्ती देशांनी एकत्र यायला हवे आणि त्याचा विरोध करायला हवा, असे त्यांनी म्हटले. यादरम्यान कार्नी यांनी कुठेही डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही. यादरम्यान टॅरिफच्या माध्यमातून लोक दबाव टाकत असल्याचे त्यांनी म्हटले. शक्तीसाली देश आपल्या देशांच्या हिंतासाठी आर्थिक एकीकरणासाठी टॅरिफ सारखे हत्यार वापरत आहेत.

यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दावोस येथील भाषणात कार्नी यांना थेट फटकारे आणि आता त्यांना बोर्ड ऑफ पीसमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषणात त्यावेळी म्हटले की, कॅनडा फक्त आणि फक्त अमेरिकेमुळेच जिवंत आहे. यावेळी मोठा इशारा देत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, मार्क यापुढे कोणतेही विधान करण्यापूर्वी तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा.

अमेरिका आणि कॅनडातील संबंध तणावात आहेत. अमेरिकेने अगोदर बोर्ड ऑफ पीससाठी निमंत्रण दिले आणि त्यानंतर संतापात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निमंत्रण वापस घेत असल्याचे म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी बोर्ड ऑफ पीसचे निमंत्रण भारतालाही दिले होते. मात्र, भारताने या बैठकीकडे पाठ फिरवली.