
इराण आणि अमेरिकेतील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. इराणमध्ये सध्या गेल्या 18 दिवसांपासून मोठे आंदोलन सुरू असून महागाई आणि सरकारविरोधात तेथील लोक रस्त्यावर उतरले आहेत. तणाव अधिक वाढताना दिसत आहे. हेच नाही तर या आंदोलनात अमेरिकेने हस्तक्षेप केला असून अनेक सूचना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिल्या जात आहेत. आंदोलकांवर सरकारकडून गोळीबार करण्यात येत असल्याची माहिती येतंय. अमेरिका आंदोलनात हस्तक्षेप करत असल्याने इराणमध्ये काही दिवस इंटरनेट बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. हेच नाही तर इराणसोबत व्यापार करणारे देशही संकटात आली आहेत. इराणच्या लोकांपर्यंत मदत पोहोचत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्याने जगात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे परिस्थिती अधिक चिघळताना दिसत आहे. इराण सरकारने अमेरिकेसोबत लढण्यासाठी आम्हीही तयार असल्याचे म्हटले असल्याने संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडियावर व्हिडीओ किंवा पोस्ट शेअर करत इराणच्या लोकांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. हेच नाही तर तुमचा लढा शेवटच्या टप्प्यात असून विजय तुमचा असल्याचेही त्यांनी म्हटले. अनेक दिवसांची लढाई जिंकण्याच्या तुम्ही अगदी जवळ आहात. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट आंदोलकांना म्हटले की, सरकारी इमारती आपल्या ताब्यात घ्या. सरकारी इमारती ताब्यात घेण्याच्या थेट सूचना डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्या.
डोनाल्ड ट्रम्प हेच इराणमधील आंदोलन भडकून देत असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. त्यामध्येच त्यांचे हे विधान म्हणजे संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे आंदोलन रोखण्यासाठी सरकारकडून काही भागात आंदोलकांवर गोळीबार केला जात आहे. आंदोलकांकडून उग्र प्रकारे आंदोलन केले जात असून जाळपोळ केली जात आहे, यामुळे सरकारकडून हे आंदोलन रोखण्यासाठी गोळीबार केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणमधील विविध भागात सरकारी रूग्णालयांबाहेर मृतदेहाचा खच पडला आहे. आंदोलन सुरू झाल्यापासून 2500 पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत. अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, इराणमधील परिस्थितीवर आमचे बारीक लश्र आहे. कोणत्याही प्रकारचा गोळीबार सहन केला जाणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिकेची मदत तुमच्यापर्यंत पोहोचत आहे.