AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधलं बोट दाखवत अश्लील चाळे करत डोनाल्ड ट्रम्प यांचा शिवीगाळ, व्हायरल व्हिडीओने खळबळ…

डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतली याचा अजिबात नेम नाही. डोनाल्ड ट्रम्प घेत असलेल्या काही निर्णयामुळे जग सध्या युद्धाच्या उबरठ्यावर आले. टॅरिफच्या माध्मयमातून ते जगावर राज करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मधलं बोट दाखवत अश्लील चाळे करत डोनाल्ड ट्रम्प यांचा शिवीगाळ, व्हायरल व्हिडीओने खळबळ...
Donald Trump
| Updated on: Jan 14, 2026 | 11:12 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प कायमच चर्चेत असणारे नाव आहे. डोनाल्ड ट्रम्प घेत असलेल्या निर्णयामुळे जग संकटात आहे. इराणला थेट हल्ला करणार असल्याची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. इराणला प्रत्येक बाजूने अडचणीत आणण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केला जात आहे. इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशावर 25 टक्के टॅरिफ आकारणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. हे आदेश असून आतापासून हा नियम लागू झाल्याचेही त्यांनी म्हटले. इराणमध्ये काही दिवसांपासून सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. इराण अशांत असून लोकांचे जीव जात आहेत. इराणच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका थेट इराणवर हल्ला करण्याची भाषा करत आहे. हेच नाही तर आम्ही इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत असून त्यांचा लढा शेवटच्या टप्प्यात असल्याचे अमेरिकेने म्हटले. मात्र, इराण सरकारने स्पष्ट म्हटले की, आमच्या देशाच्या मुद्द्यात इतरांचा हस्तक्षेप सहन करणार नाही.

सध्या डोनाल्ड ट्रम्प यांचा एक खतरनाक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प भर कॅमेऱ्यासमोर भडकताना दिसत असून थेट एका मुलाला शिवीगाळ करताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प हातवारे करून शिवीगाळ करताना दिसत आहेत. यावेळी अमेरिकेच्या अजून काही अधिकारी देखील उपस्थित दिसत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मिशिगनच्या डियरबॉर्नमध्ये फोर्डच्या मोठ्या ट्रक प्लांटचा दाैरा केला. यादरम्यान कंपनीतील कामगारांनी त्यांना जोरजोरात पेडोफाइल प्रोटेक्टर शब्द सुनावले. याचा अर्थ लहान मुलांसोबत शारिरीक संबंध ठेवणाऱ्यांना वाचवणे होतो. हे शब्द कानावर पडताच डोनाल्ड ट्रम्प भडकले आणि त्यांनी याला उत्तर दिले. त्यांनी रागा रागात काही अपशब्दही बोलले आणि थेट शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

हेच नाही तर यादरम्यान त्यांनी कामगारांना हाताचे मधले बोटही थेट दाखवले. हा सर्व धक्कादायक प्रकार थेट कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओनंतर होणाऱ्या टिकेनंतर व्हाईट हाऊसने थेट स्पष्टीकरण दिले. कंपनीतील कामगार वेडे असल्याचे त्यांनी म्हटले.तेथील लोक ओरडत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी हे केले.

बदडण्याचं प्रमाण वाढू शकतं.. मतदानाच्या आधीच संजय राऊत यांचा थेट इशारा
बदडण्याचं प्रमाण वाढू शकतं.. मतदानाच्या आधीच संजय राऊत यांचा थेट इशारा.
नागपूरकरांसाठी मोठी बातमी! 15 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद
नागपूरकरांसाठी मोठी बातमी! 15 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद.
निवडणूक आयोगाचा सत्ताधाऱ्यांना तिळगुळ! राऊतांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोगाचा सत्ताधाऱ्यांना तिळगुळ! राऊतांचा गंभीर आरोप.
दुबार मतदारांना फोडण्यासाठी ठाकरे बंधूनचं पथक सज्ज! भाजपची टीका
दुबार मतदारांना फोडण्यासाठी ठाकरे बंधूनचं पथक सज्ज! भाजपची टीका.
अदानींवरून जुंपली अन् फडणवीसांनी थेट यादीच वाचली!
अदानींवरून जुंपली अन् फडणवीसांनी थेट यादीच वाचली!.
अण्णा मलाईंच्या वक्तव्यानंतर लुंगी वाद पेटला
अण्णा मलाईंच्या वक्तव्यानंतर लुंगी वाद पेटला.
पैसे वाटपाचा धक्कादायक प्रकार! जळगावचा व्हिडीओ व्हायरल
पैसे वाटपाचा धक्कादायक प्रकार! जळगावचा व्हिडीओ व्हायरल.
म्हणजे मत विकत घेतल्याचं सिद्ध होतं! संजय शिरसाट यांचा मोठा दावा
म्हणजे मत विकत घेतल्याचं सिद्ध होतं! संजय शिरसाट यांचा मोठा दावा.
मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल, एकनाथ शिंदे यांचा विश्वास
मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल, एकनाथ शिंदे यांचा विश्वास.
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल.