AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला, जग भयंकर संकटात, तो खळबळ उडवणारा व्हिडीओ व्हायरल, थेट..

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील परिस्थितीवर मोठे भाष्य करत मदत पोहोचत असल्याचे म्हटले. इराणमध्ये सरकारविरोधात मोठा संघर्ष सुरू आहे. त्याला अमेरिका एक पाठबळ देताना दिसत आहे. हेच नाही तर इराणवर हल्ला करण्याची धमकीही देण्यात आली.

कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला, जग भयंकर संकटात, तो खळबळ उडवणारा व्हिडीओ व्हायरल, थेट..
Iran
| Updated on: Jan 14, 2026 | 7:57 AM
Share

इराणमध्ये प्रचंड तणाव सध्या बघायला मिळत आहे. लोक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले असून या आंदोलनाला थेट अमेरिकेचे पाठबळ आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान निर्वासित युवराज रेझा पहलवी यांनी एक नवीन संदेश जारी केला आहे. ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, अमेरिकेची मदत पोहोचत आहे. यासोबतच त्यांनी थेट मोठे आवाहन इराणच्या सैनिकांना केले असून लोकांची साथ द्या, तुम्ही इराणच्या लोकांच्या संरक्षणासाठी असल्याचे म्हणत त्यांनी संदेश दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करणार असल्याचे म्हटले. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणमध्ये घुसू शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणच्या लोकांचा लढा शेवटच्या टप्प्यात असून लवकरच त्यांना विजय मिळले, ते विजयाच्या अत्यंत जवळ आहेत.

इराणही अमेरिकेविरोधात लढण्यास तयार आहे. इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25 टक्के टॅरिफ लावणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले, यासोबतच आजपासून हा आदेश लागू असल्याचे त्यांनी म्हटले. इराणमध्ये स्थिती अधिक बिकट होताना दिसत आहे. इराणच्या आंदोलनात आतापर्यंत 2400 लोक मारले गेले आहेत. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी भडकवणारी विधान केले.

आता पहलवी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करत लिहिले की, प्रिय देशवासियांनो जगाने फक्त तुमचा आवाजच नाही तर तुमची हिंमत देखील बघितली आहे.त्यांच्याकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांचा संदेश तुम्ही नक्कीच ऐकला असेल. मदत येत आहे… ज्यापद्धतीने तुम्ही आतापर्यंत संघर्ष करत आलात तसा संघर्ष करत राहा. इतक्या लोकांना मारून रक्ताच्या नद्या वाहत आहेत.

या दोषी लोकांचे नाव लिहून ठेवा. त्यांना शिक्षा नक्कीच मिळणार. यादरम्यान त्यांनी सैन्याला आवाहन करत म्हटले की, माझ्याजवळ सैन्यासाठी एक मोठा संदेश असून तुम्ही इराण देशाचे सैनिक आहात… इस्लामी गणराज्याची सैना नाहीत. आपल्या देशातील लोकांची रक्षा करणे हे तुमचे पहिले कर्तव्य आहे. तुमच्याकडे जास्त वेळ नाही. शक्य तितके आमच्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करा, असे त्यांनी थेट म्हटले.

सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल.
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे.
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!.
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर.
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल.
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित.
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी.
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका.
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा.