पाकिस्तानला दणका, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री पडणार भारी, थेट..
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा फटका बसला. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत त्यांना फटका बसला. त्यांच्या पक्षाचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला. त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या लोकांचीही समस्या वाढली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत मोठा धक्का बसला. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या लोकांच्या अडचणीत वाढ झाली. डिमोक्रेटिक पार्टीने निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचे लोक, क्रिप्टोकरेंची निवेश आणि एलन मस्क यांच्यासोबतच टेकमधील महत्वाच्या लोकांच्या चाैकशीची तयारी सुरू केली. यादरम्यान पाकिस्तानसोबतचा क्रिप्टोच्या व्यवहाराचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर पाकिस्तानसोबतच्या क्रिप्टो व्यवहाराबद्दल अडचणीत येऊ शकतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्यवहार ठेवणारे सर्वजण अडचणीत येऊ शकतात. मध्यावधी निवडणुकीतील रिपब्लिकन पार्टीच्या पराभवानंतर डेमोक्रेटेक खासदारांनी चाैकशी सुरू करण्याच्या तयारींना सुरूवात केली.
डोनाल्ड ट्रम्प कायमच दावा करतात की, सिलिकॉन वॅलीचे सीईओ आणि मोठ्या कंपन्या त्यांच्यासोबत जवळीकता वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र, या निवडणुकीनंतर या कंपन्यांना आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या लोकांना याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. रिपब्लिकन पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना देखील या निवडणुकीत मोठा फटका बसला. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या नादाला लावून पाकिस्तानने आपल्याच पायावर दगड मारून घेतला.
पाकिस्तानच्या समस्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. या प्रकरणाच आता पाकिस्तानची चाैकशी होऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक केली. डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई अनेकदा पाकिस्तानात जाऊनही आले. हेच नाही तर पाकिस्तानमध्ये क्रिप्टोची मोठी गुतंवणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकरिता आपले पूर्ण मार्केट पाकिस्तानने खुले ठेवले.
या निवडणुकीत पराभव झाल्याने मोठा धक्का डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या निकटवर्तीयांना बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, मी या निवडणुकीत नसल्याने पराभव झाला. इराणसोबतचे युद्ध डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलेच महागात पडल्याचे बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबंधित लोकांची चाैकशीही होणार आहे. भारतासारख्या अनेक देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध लावली, त्याचाही फटका बसल्याचे दिसत आहे.