डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने खळबळ, जगात काहीतरी मोठं घडणार; नागरिकच संकटात येणार
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने खळबळ माजली आहे. त्यांच्या विधानाने जगात मोठं काहीतरी घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे नागरिकच संकटात येण्याची भीती आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने धक्कादायक विधाने केले जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणला धडकी भरवणारी धमकी दिली आहे. नव्या वर्षात अमेरिका आणि इराणमध्ये व्यवस्थित करार झाला नाही, तर इराणवर पुन्हा हल्ला करण्याचा विचार केला जाईल. त्यात इराणच्या तेलाच्या टँकरने नाकाबंदी भेदण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित जहाजावर हल्ले करून बुडवण्यात येईल, अशी उघड धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीने जगात एकच खळबळ उडाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरही मोठं भाष्य केलं. इराणकडून कोणताही स्वीकारण्याजोगा प्रस्ताव आलेला नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणकडून नेहमी निरर्थक बडबड सुरू असते, अशी टीका ट्रम्प यांनी केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणाला इशारा देताना म्हटलं की, इराणी जहाजांनी नाकेबंदी भेदल्यास हल्ला करून जहाज थेट समुद्रात बुडवण्यात येईल’. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी म्हटलं की, इराणने आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, अमेरिकेच्या अटी मान्य केल्या. तर अमेरिका होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यास मदत करू शकते’. इराणने पुढे म्हटलं की, परंतु वाद मिटवण्यासाठी अमेरिकेला चूक मान्य करावी लागेल. इराणला दिलेली जुनी आश्वासन मान्य करावी लागेल’.
दरम्यान, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रथ सोशलवर पोस्ट करत मध्यावधी निवडणुका आणि इराणवर भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, मी मध्यावधी निवडणुकीआधी केलेलं भाष्य आता खरं ठरत आहे. मागील एका आठवड्यात इराणने मागच्या वर्षाच्या तुलनेत अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागले . परंतु अमेरिकेच्या सैन्य सर्व पाडण्यास यशस्वी झालं. विशेष म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. निवडणुकीनंतर तेलाच्या किंमती विक्रमी निचांकी पातळीवर घसरल्या आहेत. तरी डेमोक्रॅटिक पक्ष आणि इराणला तेलाच्या किमती उच्च ठेवायच्या होत्या. परंतु मतदारांनी ही बाब समजली नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा धडकी भरवणारी धमकी इराणला दिल्याने जगात खळबळ उडाली आहे. दोन्ही देशातील वादाचा जगातील विविध देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे बदलच्या अर्थव्यवस्थेचा परिणाम जगभरातील सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होत आहे.