माझी पत्नी अंडरगारमेंट्स…, डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्नीच्या सर्वच खासगी गोष्टी सांगितल्या, …ते प्रायव्हेट सिक्रेटही सांगून टाकलं

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, त्यांनी आपल्या पत्नीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, तसेच यावेळी बोलताना त्यांनी अशा काही खासगी गोष्टी सांगितल्या ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

माझी पत्नी अंडरगारमेंट्स..., डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्नीच्या सर्वच खासगी गोष्टी सांगितल्या, ...ते प्रायव्हेट सिक्रेटही सांगून टाकलं
डोनाल्ड ट्रम्प, मेलानिया ट्रम्प
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 24, 2025 | 3:15 PM

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे कायमच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चांगलेच चर्चेत आले आहेत. एका रॅलीमध्ये ते असं काही बोलले आहेत, की त्यांच्या या वक्तव्याची केवळ अमेरिकेतच नाही तर संपूर्ण जगभरात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहेत. सध्या अमेरिकेत महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे, याच मुद्द्यावर बोलण्यासाठी ते व्यासपीठावर आले होते, मात्र महागाईवर चर्चा सुरू असतानाच त्यांनी अचानक आपल्या पत्नीच्या अंडरगारमेंट्सवर चर्चा सुरू केली, त्यांनी त्यांच्या पत्नीच्या कपाटात काय काय आहे? इथपासून ते मेलानिया ट्रम्प यांच्या प्रायव्हेट गोष्टींबद्दल अशा -अशा गोष्टी सांगितल्या की, तिथे आलेल्या सर्वांनीच लाजेनं माना खाली घातल्या. हे ट्रम्प पहिल्यांदाच बोलत नव्हते, तर यापूर्वी देखील त्यांनी अनेकदा अशाच प्रकारची काही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.

पत्नीबद्दल काय बोलले डोनाल्ड ट्रम्प?

नॉर्थ कॅरोलिनामध्ये पार पडलेल्या एका निवडणुकीच्या रॅलीमध्ये बोलताना पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरल्याचं पहायला मिळालं. डोनाल्ड ट्रम्प आपली पत्नी आणि अमेरिकेची फर्स्ट लेडी असलेल्या मेलानिया ट्रम्प यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की, 2022 मध्ये माझ्या घरावर एफबीआय (FBI) ची रेड पडली होती. या एबीयाच्या छाप्यावर बोलताना ट्रम्प यांची चांगलाच संताप व्यक्त केला. अतिशय गोपनीय असलेल्या सरकारी कागदपत्रांना चुकीच्या पद्धतीने ठेवल्याचा आरोप त्यावेळी ट्रम्प यांच्यावर करण्यात आला होता. या आरोपानंतर एफबीआयची त्यांच्या घरावर रेड पडली, याबद्दल बोलताना ते म्हणाले की, एफबीआयचे लोक माझ्या पत्नीच्या खासगी कपाटापर्यंत देखील पोहोचले, जिथे माझी पत्नी तिचे अंडरगारमेंट्स ठेवते, ती खूपच चांगल्या पद्धतीने आणि सजून त्यांना ठेवते असं वादग्रस्त वक्तव्य यावेळी ट्रम्प यांनी केलं आहे.

दरम्यान एवढंच नाही तर ट्रम्प यांनी त्यांची मुलगी इवांका ट्रम्प बद्दल देखील एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. जर इवांका माझी मुलगी नसती तर मी तिला डेट केलं असतं असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं, तसेच तिच्या फिगरबद्दल देखील ते वादग्रस्त बोलले होते. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या एका सभेमध्ये एका पत्रकाराला देखील शिवी दिली होती.