
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कायमच चर्चेत असलेले नाव आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर धक्कादायक निर्णय घेण्यास सुरूवात केली. भारतावर 50 टक्के टॅरिफ डोनाल्ड ट्रम्प यांनी लावला. यासोबतच भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता भारतावर मोठा दबाव टाकण्याचे काम डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून इराणवर हल्ला करणार असल्याचे सांगताना दिसत आहेत. शेजारी छोट्या देशांवर त्यांच्याकडून अतिक्रमण केले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प कधी काय बोलती आणि कधी काय निर्णय घेतलील याचा अजिबातच नेम नाही. भारत आणि अमेरिकेत कायमच चांगले संबंध राहिले आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे दोन्ही देशातील संबंध तणावात आहेत. डोनाल्ड ट्रम्प नेहमीच बोलताना म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत. पण सध्या काही मुद्द्यांमध्ये ते माझ्यावर नाराज आहेत.
नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक धक्कादायक विधान केले, ज्याने खळबळ उडाली. अमेरिकेत मोठा वाद निर्माण झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, त्यांनी डग बर्गम यांची अमेरिकेचे गृहमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे कारण त्याची पत्नी कॅथरीन बर्गम आकर्षक आणि सुंदर वाटली म्हणून. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे बोलणे ऐकून फक्त अमेरिकाच नाही तर जगभरात मोठी खळबळ उडाली.
एका कार्यकारी आदेशावर सही करण्यासाठी ओव्हल ऑफिसमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान ट्रम्प यांनी थेट विधान केले. डोनाल्ड ट्रम्प स्पष्ट शब्दात कॅमेऱ्याच्या पुढे बोलताना म्हटले की, ज्या व्यक्तीची पत्नी इतकी सुंदर आणि आकर्षक आहे, त्याला ते नोकरी देणार आहेत. कॅथरीन बर्गमकडे बोट दाखवत त्यांनी असेही म्हटले, ज्याच्याकडे अशी पत्नी आहे तो कौतुकास पात्र आहे.
BREAKING: Trump just claimed that he hired Doug Burgum because he was attracted to his wife. What an awkward moment.
“I saw them riding horses in a video. And I said, ‘Who is that?’ I was talking about her, not him. I said, ‘I’m gonna hire her,’ because anybody that has… pic.twitter.com/BE7BqEql0T
— Brian Krassenstein (@krassenstein) January 29, 2026
कॅथरीन बर्गम याच्याकडे इतकी सुंदर आणि आकर्षक पत्नी असल्यानेच मी त्याला मंत्रीपद दिले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधाानाने मोठी खळबळ उडाली. आता डोनाल्ड ट्रम्प यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केल्याचेही बघायला मिळत आहे.