AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार, बैठकांचं सत्र, पार्थ पवारांच्या गळ्यात खासदारकीची माळ?

Sunetra Pawar Resign MP Post: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. मोठी खलबतं सुरू आहे. बारामतीसह मुंबईत अनेक घडामोडी घडत आहेत. पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार आणि इतर नेत्यांची मुंबईत बैठक सुरू आहे. पवार या राज्यसभेच्या सदस्य पदाचा राजीनामा देणार आहेत.

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार, बैठकांचं सत्र, पार्थ पवारांच्या गळ्यात खासदारकीची माळ?
सुनेत्रा पवार, पार्थ पवार, अजित पवारImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Jan 31, 2026 | 12:58 PM
Share

Sunetra Pawar Resign MP Post: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खलबतं सुरू आहेत.मुंबई आणि बारामतीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. पार्थ पवार हे शरद पवार यांच्याशी चर्चा करत आहे. तर दुसरीकडे मुंबईत सुनेत्रा पवार या देवगिरी बंगल्यावर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि इतर नेत्यांशी चर्चा करत आहेत. लवकरच त्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच गटनेतेपदी त्यांची निवड होऊन लागलीच संध्याकाळी त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. त्यादृष्टीने वेगवान घडामोडी घडत आहे.

सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार

थोड्याच वेळात सुनेत्रा पवार या आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. राजीनामा हा राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांच्याकडे पाठवणार आहेत. राज्यसभेच्या खासदारकीच्या राजीनाम्या नंतर सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेता म्हणून निवड आज दुपारी करण्यात येणार आहे. आजच संध्याकाळी ५:३० वाजता उपमुख्यमंत्री पदाची सुनेत्रा पवार शपथ घेतील. अवघ्या १० मिनिटांचा शपथविधीचा कार्यक्रम असणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पार्थ पवार राज्यसभेवर?

सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यावर राज्यसभेतील त्यांच्या रिक्त जागेवर पार्थ पवार यांना पाठवण्याची तयारी झाल्याचे समजते. पार्थ पवार यांचे नाव राज्यसभेवर खासदार पदासाठी पाठवण्यात येणार आहे. तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वही त्यांच्या नावासाठी सकारात्मक असल्याची माहिती समोर येत आहे. इतकेच नाही तर राज्यसभेवर जाण्याची पार्थ पवार यांची सुद्धा इच्छा असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या राज्यसभेवर खासदार म्हणून पार्थ पवार यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करणार असल्याची माहिती नसल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान पार्थ पवार हे गेल्या तासाभरापासून शरद पवार यांच्याशी चर्चा करत आहेत. ते या घटनाक्रमाविषयी शरद पवार यांना माहिती देणार असल्याचे समजते. लवकरच राजकीय गोटातून अजून एक मोठी बातमी समोर येण्याची शक्यता आहे.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना