AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचा ड्रोनद्वारे भारतीय जहाजावर हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, थेट..

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला. एकीकडे युद्धविराम करारावर चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे मोठे हल्ले ओमानच्या आखातात सुरू आहे. यादरम्यानच भारतीय जहाजांवर हल्ले केले जात आहेत. भारताच्या जहाजावर हल्ले झाले. यावर आता इराणकडून मोठी प्रतिक्रिया देण्यात आली.

इराणचा ड्रोनद्वारे भारतीय जहाजावर हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, थेट..
Indian ships attack
| Updated on: Jun 13, 2026 | 11:29 AM
Share

होर्मुज खाडीत तणाव अधिक वाढला आहे. ओमानच्या आखात भारतीय जहाजावर हल्ला करण्यात आला. सतत जहाजांना टार्गेट केले जातंय. भारतीय जहाजावर झालेल्या हल्ल्यात 3 भारतीय ठार झाले. ज्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली. भारताने अमेरिकेला खडेबोल सुनावले आणि अशी हल्ले खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेच्या नाैदलाकडून भारतीय जहाजावर हल्ला करण्यात आला. एकीकडे भारत महान देश आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत, सांगायचे आणि दुसरीकडे भारतीय जहाजावर मोठे हल्ले करायचे असे काम अमेरिकेचे सुरू आहे. अजून एका जहाजावर अमेरिकेने हल्ला केला, ज्यात 27 भारतीय नागरिक होते. ओमानच्या तटरक्षक दलाकडून या सर्व भारतीय खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. अमेरिकेच्या नाैदलाकडूनच हा हल्ला भारतीय जहाजांवर केला जात असल्याचे स्पष्ट असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कादायक दावा केला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच मोठा दावा करत म्हटले की, भारतीय जहाजांवर अमेरिकेने नाही तर इराणने त्यांच्या ड्रोनच्या मदतीने हल्ला केला. आता अमेरिकेच्या या दाव्यावर तात्काळ इराणनेही प्रतिक्रिया दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यावर भारतातील इराणच्या दूतावासाने म्हटले, अमेरिका लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी केलेला दावा खोटा आहे.

इराणचा दावा आहे की, एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत अमेरिकन सैन्याने भारतीय खलाशी असलेल्या तीन जहाजांवर हल्ले केले, ज्यामध्ये तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. भारतातील इराणी दूतावासाने एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटले की, ट्रम्प यांनी भारतीय जहाजावर झालेल्या हल्ल्याबाबत केलेले आरोप निराधार आहेत. भारतीय खलाशांचा बळी घेणाऱ्या अलीकडील हल्ल्यांवरून लक्ष विचलित करण्याचा अमेरिकेचा हा प्रयत्न असल्याचेही दूतावासाने म्हटले.

भारतीय जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर भारत नाराज आहे. अमेरिकेजवळ याबाबत उघड भूमिकाही भारताने घेतली. कोणत्याही परिस्थितीमध्ये असे हल्ले स्वीकार केले जाणार नसल्याचे भारताने म्हटले आहे. शिवाय अमेरिका जे आरोप करत आहेत, ते देखील इराणने फेटाळून लावली आहेत. अमेरिकेच्याच लष्कराने भारतीय जहाजावर हल्ला केला.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल