AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका इराण युद्ध संपले! याच आठवड्यात होऊ शकतो युद्धविराम करार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, थेट..

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाने जगात अस्थिरता निर्माण झाली. गेल्या दोन दिवसांपासून स्थिती अधिक गंभीर आहे. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली. विशेष म्हणजे ज्याची प्रतिक्षा जग करत होते, ती घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आली.

अमेरिका इराण युद्ध संपले! याच आठवड्यात होऊ शकतो युद्धविराम करार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, थेट..
Donald Trump
| Updated on: Jun 12, 2026 | 7:13 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला. होर्मुज जवळ अमेरिकेचे हेलिकॉप्टर कोसळल्याने अमेरिकेने थेट इराणवर हल्ले करण्यास सुरूवात केली. ज्याने जगात एकच खळबळ उडाली. संपूर्ण जगाला ज्या घोषणेची प्रतिक्षा होती, अखेर ती घोषणा करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम शांतता कराराबद्दल मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की, या कराराच्या अटींना मंजुरी देण्यात आली असून तेहरानसोबत या आठवड्यातच करार होऊ शकतो. त्यांनी पुढे म्हटले की, या कराराचे ठिकाण आणि वेळ लवकरच जाहीर केली जाईल. म्हणजे अखेर इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबले आहे. थेट युद्ध थांबवण्याबद्दल त्यांनी ही घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर जगाने सुटकेचा निश्वास घेतला. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत होती. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी हे भाष्य केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांसोबत बोलताना म्हटले की, इराणसोबतच्या युद्धात आम्ही एका जबरदस्त करारापर्यंत पोहोचलो आहोत. हा करार स्वाक्षरीकृत होताच स्ट्रेट ऑफ होर्मुझ अधिकृतपणे खुले केले जाईल. विशेष म्हणजे हे सर्व खूप जास्त लवकर घडणार आहे. कदाचित याच आठवड्याच्या अखेरीस. म्हणजेच काय तर याच आठवड्यात इराण आणि अमेरिका युद्ध थांबू शकते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, या करारादरम्यान इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, संयुक्त अरब अमिराती, कतार, सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत यासारख्या अन्य काही देशांसोबत त्यांनी याबाबत चर्चा केली. त्यांनी अण्वस्त्रेबाबत बोलताना म्हटले की, अण्वस्त्रे असण्याचा प्रश्नही निघाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा पुन्हा म्हटले की, इराणकडे अण्वस्त्रे नसणार आहेत.

इराण अण्वस्त्रे बनवू शकणार नाही. करारातील महत्वाचा मुद्दा तोच होता. ही एक मोठी कामगिरी असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्याला इराण नक्की काय उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. काल ओमानच्या समुद्रकिनारी थेट भारतीय जहाजावर हल्ला करण्यात आला. ओमानची खाडीमध्ये अमेरिकेला दिसेल त्या जहाजावर हल्ला करताना दिसली.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच