AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही अप्रामाणिक आहात की मूर्ख.. भर मुलाखतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प संतापले, थेट अर्ध्यातच..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कायमच चर्चेत असलेले नाव आहे. डोनाल्ड ट्रम्प इराणसोबतच्या युद्धात व्यस्त आहेत. यादरम्यानच त्यांनी एक मुलाखत दिली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या मुलाखतीने मोठे तूफान उठले आहे.

तुम्ही अप्रामाणिक आहात की मूर्ख.. भर मुलाखतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प संतापले, थेट अर्ध्यातच..
Donald Trump
| Updated on: Jun 08, 2026 | 8:55 AM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला केल्यापासून त्यांच्यावर जगाचा दबाव आहे. इस्त्रायलच्या नादी लागू अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याची चूक केल्याचे बोलले जात आहे. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतूनही मोठा विरोध होत आहे. इराणसोबतच्या युद्धाचे परिणाम अमेरिकेत दिसत आहेत. इराणजवळ मोठ्या संख्येने अमेरिकेच्या युद्धनाैका तैनात आहेत. या युद्धात इराणकडून अमेरिकेचे अनेक लढाऊ विमाने पाडण्यात आली. अमेरिकेत महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर होणारी टीका चांगलीच वाढली आहे. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा संताप व्यक्त केला. हेच नाही तर त्यांचा भडका इतका जास्त उठला की, त्यांनी मुलाखत अर्धवट सोडून दिली. रागाने ते उठून चालत राहिले.

डोनाल्ड ट्रम्प मुलाखतीदरम्यान थेट पत्रकारालाच अप्रामाणिक आणि मुर्ख म्हणतानाही दिसले. डोनाल्ड ट्रम्प रविवारी एनबीसीच्या मीट द प्रेस या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यादरम्यान पत्रकाराने त्यांना कॅलिफोर्नियातील निवडणुकीत झालेल्या फसवणुकीच्या दाव्यांचा वारंवार पुरावा विचारला. तेव्हा त्यांचा संताप झाला. कोणताही विचार न करता ते थेट राष्ट्रीय दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या मुलाखतीतून निघून गेले.

लिफोर्नियातील मतमोजणीच्या संथ गतीने सुरू असल्याचे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप केले. यावर मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराने म्हटले की, मतमोजणीला इतका वेळ लागणे ही कॅलिफोर्नियामध्ये मतपत्रिका मोजण्याची सामान्य पद्धत आहे. यावर डोनाल्ड ट्रम्प भडकले आणि म्हटले की, तुम्हाला माहिती आहे का? ते तसे का करत आहेत ते? कारण ते निवडणुकीत हेराफेरी करत आहेत.

यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना थेट विचारण्यात आले की, ते अशाप्रकारचा दावा करत आहेत तर त्यांच्याकडे काही पुरावा आहे का? पुरावा मागताच डोनाल्ड ट्रम्प यांचा भडका उडाला. त्यांनी म्हटले की, मला बघायचे आहे. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना अजून काही प्रश्न विचारण्यात आली. ते इतके जास्त भडकले की, ते मुलाखत अर्धवट सोडूनच निघून गेले.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार