मोठी बातमी! इराणसोबतच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, युद्ध संपणार, थेट सांगितला वेळ..

जगाला ज्या घोषणेची प्रतिक्षा होती ती अखेर मोठी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचे युद्ध कधी थांबणार यावर थेट मोठे भाष्य केले. हेच नाही तर त्यांनी थेट वेळच सांगून टाकला आहे.

मोठी बातमी! इराणसोबतच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, युद्ध संपणार, थेट सांगितला वेळ..
Donald Trump announcement
| Updated on: Jun 09, 2026 | 8:29 AM

इराण आणि इस्त्रायल यांच्यात तणाव वाढला आहे. यादरम्यानच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाबाबत ही घोषणा केली. अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून मोठा हल्ला इराणवर केला. 3 महिन्यापेक्षाही अधिक काळापासून हे युद्ध सुरू आहे. यादरम्यानच मागील दोन दिवसांपासून इस्त्रायल आणि इराण यांच्यात तणाव वाढत आहे. इस्त्रायलला खडेबोलही अमेरिकेने सुनावले.  इराणवरील हल्ले थांबवा नाही तर एकटे युद्ध लढा असे स्पष्ट म्हटले. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिका दोन आठवड्याच्या आतच संपूर्ण विजय घोषित करेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट म्हटले की, इराण सर्वकाही देण्यास तयार आहे. म्हणजे अमेरिकेने ठेवलेल्या अटी मान्य करण्यास तयार आहे.  3 महिन्यानंतर ही मोठी गुड न्यूज आली. यासोबतच या संपूर्ण विजयाच्या घोषणेनंतर जगातील वाढलेल्या तेलाच्या किमती आपोआपच खाली येतील.

एका कार्यक्रमात ऑनलाईन बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, पुढच्या दोन आठवड्याच्या आतच आम्ही संपूर्ण विजयाची घोषणा करू. त्यावेळी तुम्ही खऱ्या अर्थाने जिंकलेले असाल. तो एक संपूर्ण मोठा विजय असेल. हे आता खूपच लवकर घडणार आहे. त्यानंतर तेलाच्या किमती थेट कमी होतील.

अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम चर्चा सुरू आहे. काही देशांनी मध्यस्थीची भूमिका घेतली. यादरम्यानच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांच थेट विजयाची घोषणा दोन आठवड्याच्या आत करू म्हटले. म्हणजे थोडक्यात काय तर आता इराण आणि अमेरिका युद्ध दोन आठवड्याच्या आत संपणार आहे. 3 महिन्यांपासून हे युद्ध सुरू आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्च्या तेलाची साखळी विस्कळीत झाली. अनेक देशात एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. जागतिक बाजाराज कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धविराम कराराच्या अत्यंत जवळ पोहोचल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानावरून स्पष्ट होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us