फ्लायदुबईच्या घटनेबद्दल हादरवणारी माहिती, जगाला ज्याची भीती तेच घडले, थेट डोनाल्ड ट्रम्प यांनीच..

फ्लायदुबईच्या विमानात घडलेल्या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. एकच खळबळ उडाली. भारतीय पायलट स्मित मच्छार याने जे काही केले त्याचे जोरदार काैतुक केले जात आहे. त्यातच आता धक्कादायक माहिती पुढे येतंय.

फ्लायदुबईच्या घटनेबद्दल हादरवणारी माहिती, जगाला ज्याची भीती तेच घडले, थेट डोनाल्ड ट्रम्प यांनीच..
Flydubai flight and Donald Trump
| Updated on: Oct 02, 2026 | 7:48 AM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लायदुबईच्या घटनेबद्दल मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, विमान पाडण्याचा प्रयत्न करत असलेल्या पायलटचे आणि इराणचे संबंध असू शकतात. सध्या याबाबत तपास सुरू आहे. भारतीय पायलट स्मित मच्छार याच्यावर त्याने हल्ला केला आणि विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. व्हाईट हाऊसच्या रिपोर्टनुसार, पायलट आणि तेहरान यांच्यात संबंध दिसून येत आहेत. आम्ही सध्या याच्यावर काम करत आहोत. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मी याबाबत ऐकत आहे. माझ्या कानावर काही गोष्टी येत आहेत. त्यानुसार, मी सांगू शकतो की, होय या पायलटचा आणि इराणचा संबंध दिसतोय.

पण अजूनही यावर काम सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना थेट विचारण्यात आले की, फ्लायदुबईच्या विमानात जी घटना घडली, त्यामागे इराणचा हात आहे का? त्यावर त्यांनी हो म्हणत मोठी कारवाई केली जाईल, असे स्पष्ट म्हटले. चिंता नका करू. तुम्ही त्यांना विचारा… त्यांना माहिती आहे की काय झाले. त्यांच्याकडून खतरनाक कारवाई केली जाईल. हा नागरिक ओमानचा आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले.

Loading...

साैदी अरेबियाचे अधिकारी इस्त्रायलसोबतच इतरही देशांमध्ये अशा प्रकारचा हल्ला करण्याचा काही कट आहे का? याचा तपास केला जात आहे. संयुक्त अरब अमिरात, अमेरिका आणि ओमान या तपासात सहभागी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायली गुप्तचर यंत्रणाही या प्रक्रियेत सहभागी असणार आहे. भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्यामुळे 180 लोकांचा जीव वाचला.

ओमानच्या को पायलटने भारतीय पायलट स्मित याच्यावर हल्ला केला. ओमानच्या पायलटने हे विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. त्याने विमान खाली आणले. भारतीय पायलटने गंभीर जखमी असतानाही कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि आवाज दिला. त्यानंतर को पायलटला लोकांनी पकडले. ज्यानंतर विमान तेल अवीवकडे जाण्याऐवजी पुन्हा साैदीकडे वळवण्यात आले. भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us