
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून इस्त्रायल-हमास युद्धात मध्यस्थी करताना दिसले. विशेष म्हणजे त्यांनी 20 कलमी प्रस्ताव देखील ठेवला, ज्याला इस्त्रायलने होकार दिला. हमासने काही वेळ हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी घेतला. आता नुकताच महत्वाची घोषणा करण्यात आली. ज्यात थेट इस्रायलने गाझा पट्टीतून टप्प्याटप्प्याने आपले सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर काही वर्षानंतर गाझापट्टीमध्ये शांततेचे संकेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दलची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट शेअर करताना स्पष्ट केले हमासला या प्राथमिक माघारीची रेषा मान्यबद्दल माहिती देण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, जर हमास सहमत झाला तर तात्काळ युद्धबंदी लागू केली जाईल आणि ओलिस आणि कैद्यांच्या देवाणघेवाणीची प्रक्रिया देखील सुरू होईल. अमेरिकेने ठेवलेल्या या प्रस्तावाला अजूनही हमासने होकार दिला नाही. त्यांना काही मुद्द्यावर आक्षेप आहे. मात्र, हमासकडूनही या प्रस्तावालाबद्दल सकारात्मक भूमिका असल्याचेही सांगितले जात आहे.
ट्रम्प यांनी म्हटले, युद्धबंदीसाठी इस्रायलने प्राथमिक माघारीची रेषा मान्य केली आहे, ज्याच्याबद्दल आम्ही अगोदरच हमासला माहिती दिली. हमासने देखील सकारात्मक भूमिका घेतली तर युद्धबंदी ताबडतोब लागू होईल आणि ओलिस आणि कैद्यांची देवाणघेवाण सुरू होईल. हमासला 20 कलमी प्रस्ताव मान्य करण्यासाठी 6 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. जर हमासने हा प्रस्ताव मंजूर केला नाही तर त्यांच्यावर मोठी कारवाई होऊ शकते.
अमेरिकेने अगोदरच हमासला मोठा इशारा दिला आहे की, त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला नाही तर त्यांना वाईट परिणांना सामोरे जावे लागेल. इस्त्रायलला पूर्ण सूट हमासवर हल्ला करण्यासाठी मिळणार आहे. हमासने म्हटले आहे की, ते गाझाचे प्रशासन स्वतंत्र तांत्रिक तज्ञांच्या पॅलेस्टिनी संस्थेकडे सोपवेल, ज्याला अरब आणि इस्लामिक देशांचा पाठिंबा असेल. डोनाल्ड ट्रम्प यादरम्यानच नोबेल पुरस्कारासाठी देखील दावा करताना दिसत आहेत.