QUAD Meeting : डोनाल्ड ट्रम्प आधी द्यायचे भारताला धमकी, आता मोदींची वाहवा, म्हणाले मोदी खूप खणखर व्यक्ती!
चारही नेते फोटासाठी एकत्र आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी यांचे कौतुक केले. मोदी हे कणखर नेते आहेत, असं ट्रम्प म्हणाले. दरम्यान, या बैठकीवेळी मोदी यांनीही मनोगत व्यक्त केले.

QUAD Meeting : मनीला येथे सध्या क्वाड देशांच्या नेत्यांची बैठक आहे. या बैठकीला भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या देशांचे सर्वोच्च नेते उपस्थित आहेत. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा होत आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील संबंध सध्या काहीसे बिघडलेले आहेत. सध्या क्वाड बैठकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एकत्र आलेल आहेत. त्यामुळे या बैठकीनंतर भविष्यात दोन्ही देशांचे संबंधांना नवे रुप मिळावे, असी अपेक्षा व्यक्त केली जातेय. दरम्यान, ही अपेक्षा केली जात असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. मोदी हे कणखर नेते आहेत, असं ट्रम्प म्हणाले आहेत.
क्वाड बैठकीवेळी चारही देशांच्या प्रमुखांनी एकत्र येत फोटो काढले. डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त या बैठकीत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, जपानचे पंतप्रधान साताए ताकाइची यांचीही उपस्थिती आहे. या बैठक हिंद-प्रशांत क्षेत्राची सुरक्षा, प्रादेशिक आव्हाने, एकमेकांना सहकार्य यावर चर्चा झाली.
चारही नेते फोटासाठी एकत्र आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी यांचे कौतुक केले. मोदी हे कणखर नेते आहेत, असं ट्रम्प म्हणाले. दरम्यान, या बैठकीवेळी मोदी यांनीही मनोगत व्यक्त केले. आजच्या बैठकीनंतर क्वाड आणखी मजबूत होईल. भारतासाठी क्वाड ही एक विश्वसनीय भागिदारी आहे. सागरी सुरक्षेपासून ते विश्वासार्ह पुरवठा साखळीपर्यंत, नवीन तंत्रज्ञानापासून ते आपत्ती व्यवस्थापनापर्यंत क्वाडने चांगल्या उपाययोजना पुरवाव्यात हे सुनिश्चित करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे, असे यावेळी मोदी यांनी सांगितले.
मला तुम्हा सगळ्यांना भेटून खून आनंद होत आहे. मनीला आणि क्वाड यांचे एक खास नाते आहे. 2007 साली चारही देशांचे अधिकारी सर्वप्रथम याच ठिकाणी भेटले होते. त्यानंतर दहा वर्षांनी याच शहरात आपण चर्चेला पुन्हा सुरुवात केली होती. याच ऐतिहासिक शहरात पुन्हा एकदा क्वाडची बैठक होत आहे, असेही यावेळी मोदी म्हणाले.