
इराणला सिजफायरच्या बोलण्यात अडकवून अमेरिका आता इराणवर निर्णायक आणि अखेरचा मोठा प्रहार करण्याची योजना आखत आहे. पेंटागनाचा प्रयत्न निर्णायक प्रहार करुन हे युद्ध संपवण्याचा आहे. यासाठी आता अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ सक्रीय झाले आहेत. हे युद्ध दीर्घकाल लांबू नये यासाठी हा प्लान रचला जात आहे. वास्तविक इराण युद्ध लवकर समाप्त करण्यास अपयशी ठरल्याने अमेरिका बॅकफूटवर गेला आहे. एकीकडे अमेरिकेसह संपूर्ण जगात आर्थिक संकटाचे ढग गडद झाले आहेत. तर दुसरीकडे इराणमध्ये सत्ता बदल न झाल्याने अमेरिकेचा प्लान उद्धवस्थ होताना दिसत आहे.
अमेरिका मीडिया आऊटलेट एक्सियोसच्या माहितीनुसार सिजफायर संदर्भात इराणने होकार दिला नाही तर अमेरिका इराणवर मोठा हल्ला करण्याची योजना आखत आहे. या अंतर्गत इराणची महत्वाची बंदरे ( उदा. खर्ग, अबू मूसा ) यांच्यावर कब्जा करणे, तेल मार्गांची घेराबंदी करणे वा मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले आणि शक्यतो जमीनीवरील लढाईला सुरुवात करणे यांचा समावेश आहे.
1. खार्ग बेटांवर (इराणचे मुख्य तेल निर्यात केंद्र) कब्जा करणे वा त्याची घेराबंदी करणे. येथून इराणचा ९० टक्के तेल पुरवठा केला जातो.
2. लारक बेटावर (होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रणासाठी महत्वाचे ) हल्ला करणे किंवा कब्जा करणे, जगातील २० टक्के तेल पुरवठा येथून होतो.
3. अबू मूसा + आसपासच्या बेटांवर (होर्मुझ सामुद्रधुनीचे महत्वाचे प्रवेश द्वार) वर कब्जा करणे. यावर नियंत्रण करुन होर्मुझच्या भागातील इराणचे वर्चस्व नष्ट होईल.
4. या क्षेत्रातील इराणी इंधन टाक्यांना रोखणे वा त्यांच्यावर कब्जा करणे आणि आण्विक – ऊर्जा स्थळांवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले करणे.
5. आण्विक सामुग्रीला सुरक्षित करण्यासाठी इराणच्या आत जमीनी सैनिक कारवाई करणे, यासाठी अमेरिकेने १००० मरीन्सचे जवान मध्य पूर्वेत पाठवले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल ट्रुथवर एक पोस्ट लिहून इराणला वाटाघाटी चर्चेतून काढता पाय न घेण्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी लिहिलेय की इराणचे अधिकारी एकीकडे आमच्याकडे चर्चेसाठी आणि वाटाघाटी करण्यासाठी भिक मागत आहेत. दुसरीकडे पब्लिकमध्ये हे सांगत आहेत की आम्ही अभ्यास करतोय. प्रस्तावातून पळणे इराणसाठी फायद्याचे नाही.
ट्रम्प यांनी पुढे म्हटले आहे की जर चर्चेतून युद्धविराम झाला नाही तर मागे वळून पाहण्यासाठी मागे काहीच उरणार नाही. इराण एवढी मोठी चूक कशी काय करु शकतो ?