Donald Trump : दिवाळीपूर्वी ट्रम्प यांच्याकडून भारतीयांसाठी गुड न्यूज ! टॅरिफवर मोठा निर्णय, मिळणार दिलासा

Donald Trump tariff plans : ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे भारतासह जगभरातील अनेक देशांना मोठा धक्का बसला आहे. बाजारपेठेवरही त्याचा मोठा परिणाम पहायला मिळाला. मात्र ट्रम्प त्यांच्या भूमिकेवर ठाम होते, मात्र आता दिवाळीपूर्वी भारतीयांना अमेरिकेकडून मोठी खुशखबरी मिळाली आहे. ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला असून त्यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Donald Trump : दिवाळीपूर्वी ट्रम्प यांच्याकडून भारतीयांसाठी गुड न्यूज ! टॅरिफवर मोठा निर्णय, मिळणार दिलासा
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
| Updated on: Oct 09, 2025 | 12:45 PM

US Tariff Plan on India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी उगारलेल्या टॅरिफ (Tariff)  शस्त्रामुळे संपूर्ण जगाला तर धक्का बसलाच पण 50 टक्के टॅरिफ आकरल्यामुळे भारतीय बाजारपेठ आणि अर्थव्यवस्थेला सर्वाधिक फटका बसला आहे. याचा भारतावर मोठा परिणाम झाला असून ट्रम्प यांनी मात्र आपला ताठा कायम ठेवला होता. अनेक उद्योग धंदे यामुळे धोक्यात आले. मात्र आता याच ट्रम्प प्रशासनाने टॅरिफबद्दल मोठा निर्णय घेतला असून त्यामुळे दिवाळीपूर्वी भारतीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. जेनेरिक औषधांवर टॅरिफ लादण्याची योजना सध्या, ट्रम्प प्रशासनातर्फ पुढे ढकलण्यात आली आहे. त्यांचा हा निर्णय भारतीय औषध कंपन्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरेल कारण अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या बहुतेक औषधांची निर्यात भारतातून केली जाते. दिवाळीपूर्वी भारतीय कंपन्यांसाठी ही मोठी खुशखबरच म्हणावी लागेल.

जगातील आघाडीची वैद्यकीय डेटा विश्लेषण कंपनी IQVIA च्या मते, भारत ही औषधांची एक प्रमुख बाजारपेठ आहे आणि अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्येही 47 टक्के औषधे भारतातून आयात केली जातात. तसेच एकूण औषधांपैकी 30% हिस्सा हा भारताचा आहे, तर उर्वरित औषधे इतर देशांमधून येतात. भारताला जगाचा दवाखाना म्हणून ओळखलं जातं.

ट्रम्प प्रशासनाने का घेतला यू टर्न ?

टॅरिफबद्दल ट्रम्प प्रशासनने अचानक हा यू टर्न का घेतला ? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, ट्रम्प यांनी हे पाऊल उचलल्यामुळे, वाणिज्य विभागाकडून औषधांवरील सुरू असलेल्या टॅरिफ चौकशीची व्याप्ती मर्यादित होते. तपासणीत असे आढळून आले की जेनेरिक आणि नॉन-जेनेरिक दोन्ही तयार औषधे, तसेच औषध निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची तपासणी केली जाईल. तथापि, या मुद्द्यावर व्हाईट हाऊसमध्ये मतभेद आहेत. मात्र, असे असले तरीही व्हाईट हाऊसमध्येही या मुद्द्यावर मतभेद आहेत. आयात केलेल्या औषधांवर मोठ्या प्रमाणात कर लादण्याचा सल्ला एका गटाने दिला आहे जेणेकरून औषधांचे उत्पादन आणि मार्केट अमेरिकेत परत येईल. मात्र, दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की जेनेरिक औषधांवर शुल्क लादल्यामुळे अमेरिकेत औषधांच्या किमती वाढतील आणि बाजारात तुटवडा निर्माण होऊ शकतो.

Donald Trump Tariff : भारताच्या कोणकोणत्या गोष्टींवर ट्रम्पचा ‘टॅरिफ वार’ ? संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर

ट्रम्प यांच्या टॅरिफचीच सर्वत्र चर्चा

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या टॅरिफ वॉरमुळे चर्चेत आहेत, ज्यामुळे चीनने अमेरिकन कृषी उत्पादनांवर टॅरिफ लादल्यानंतर त्यांची खरेदी थांबवली आहे. याचा अमेरिकन शेतकऱ्यांवर नकारात्मक परिणाम झाला. तसेच भारतीय औषधांमुळे अमेरिकेच्या हेल्थ सेक्टरला लक्षणीयरीत्या फायदा होतो, कारण इथे उत्पादित होणारी स्वस्त औषधे, टॅरिफ लावल्यानंतरही स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या औषधांपेक्षा स्वस्त असतात
अमेरिकेत मधुमेह, कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि सामान्य अँटीबायोटिक्स औषधांच्या सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे.