
जगात दिवसेंदिवस मानवी मुल्यांचा हाऱ्स सुरु आहे. जगाच्या अनेक भागांमध्ये युद्ध सुरु आहेत. आर्थिक प्रगती, विस्तारवादाची महत्वकांक्षा, शस्त्रास्त्र लॉबी यामधून या सर्व लढाया सुरु आहेत. आपण आज सुरक्षित देशात राहतो म्हणून आपल्याला त्याची कल्पना नाही. पण किड्या-मुंग्यांसारखी माणस मारली जात आहेत. मानवी जीवन किती अमूल्य आहे, त्याच महत्वच कोणीच लक्षात घेत नाहीय. युद्धाचे सुद्धा काही नियम असतात. पण काही ठिकाणी ते सुद्धा पाळले जात नाहीत. उत्तर आफ्रिकेतील सुदान या देशात अशीच एक धक्कादायक घटना घडली. नागरिक त्यांची धार्मिक प्रार्थना करत असताना ड्रोनव्दारे हल्ला झाला.
सूदानच्या उत्तरेला दारफुरची राजधानी अल फशर शहरात एका अर्धसैनिक संघटनेने शुक्रवारी मशिदीवर ड्रोन हल्ला केला. यावेळी तिथे नमाज पठण करणाऱ्या 43 नागरिकांचा मृत्यू झाला. सूदानच्या डॉक्टर्स नेटवर्कने शुक्रवारी एक्सवर लिहिलय की, रॅपिड सपोर्ट फोर्सेजच्या (आरएसएफ)ड्रोन हल्ल्यात अनेक वुद्ध आणि लहान मुलं मारली गेली. सूदान डॉक्टर्स नेटवर्कने या हल्ल्याचा निषेध केला आहे. निरपराध नागरिकांवर केलेला हा क्रूर हल्ला आहे. मानवी आणि धार्मिक मूल्य पायदळी तुडवण्यात आली. आंतरराष्ट्रीय कायद्याच हे उल्लंघन असल्याच सूदान डॉक्टर्स नेटवर्कने म्हटलं आहे.
जो दुर्व्यवहार, अमानवीयतेवर लक्ष ठेवतो
द रेसिसटेंस कमिटीज इन अल फशरने शुक्रवारी एक वीडियो पोस्ट केला.यात कथितरित्या मशिदीचा काही भाग ढीगाऱ्यामध्ये बदलल्याच दिसून येतय. तिथे अनेक मृतदेह पडले आहेत. एसोसिएटेड प्रेस स्वतंत्ररित्या या फुटेजची पुष्टि केलेली नाही. द रेसिसटेंस कमिटीज इन अल फ़शर स्थानिक नागरिक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचा एक समूह आहे, जो दुर्व्यवहार, अमानवीयतेवर लक्ष ठेवतो.
कमीत कमी 40,000 नागरिकांचा मृत्यू
मशिदीच्या सध्याच्या स्थितीबद्दल काही ठोस माहिती मिळालेली नाही. ताजा ड्रोन हल्ला हा मागच्या आठवड्यात झालेल्या हल्ल्याच्या साखळीचा एक भाग आहे. त्यावेळी आरएसएफ आणि सैन्यामध्ये अल फशरमध्ये भीषण संघर्ष झालेला. सेना आणि आरएसएफमध्ये एप्रिल 2023 पासून युद्ध सुरु आहे. सूदानमधील हे भीषण गृहयुद्ध आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, या गृहयुद्धात कमीत कमी 40,000 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 1.2 कोटी पेक्षा अधिक लोक विस्थापित झाले आहेत. अनेकांची स्थिती खूप वाईट आहे.