
भारताला महासत्ता म्हणून बघितले जाते. भारत लवकरच महासत्ता होऊ शकतो, यामुळे कुठेतरी भारताला दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे भारतावर भरमसाठ टॅरिफ लावणे. यासोबतच भारतीय लोक विदेशात जाऊन मोठ्या प्रमाणात नोकऱ्या करतात. मागील काही वर्षात बघितले गेले तर भारताने प्रचंड प्रगती केली. जागतिक राजकारणात भारत सध्या एका मजबूत स्थितीत नक्कीच आहे. भारतावर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर अनेक देश भारतासोबत व्यापार करार करण्यासाठी पुढे आले. युरोप उघडपणे मान्य करत आहे की भारताशिवाय त्यांची रणनीती अपूर्ण आहे. अनेक देशांसोबत भारताने मुक्त व्यापार करार केली आहेत. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारताने अनेक पर्याय शोधत मार्ग काढला. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावूनही कोणत्याच परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला नाही.
युरोपियन युनियनचे प्रमुख नेते 26 जानेवारी रोजी होणाऱ्या या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येत आहेत. यावरून जगाला मोठा संदेश मिळतोय. फक्त प्रजासत्ताक दिनानिमित्तच युरोपिय युनियनचे प्रमुख येत नाही तर महत्वाचे आर्थिक प्रस्तावही भारतासाठी घेऊन येत आहेत. ज्यावेळी भारताच्या शेजारी देश पाकिस्तानची थेट झोप उडाली आहे.
भारत भेटीपूर्वीच युरोपियन युनियनने मान्य केले की, भारत हा भविष्यातील अत्यंत मोठी शक्ती असलेला देश आहे. भारताशिवाय आम्ही अपूर्ण असल्याचेही मोठी विधान युरोपियन युनियनने मान्य केले. युरोपियन युनियनच्या या विधानाने भारताची नक्कीच पॉवर काय आहे हे स्पष्ट होते.
जगात अनेक देशांमध्ये युद्धाची स्थिती आहे तर काही ठिकाणी युद्ध देखील सुरू आहे. राजकीय अस्थिरता यासोबतच आर्थिक दबाव मोठ्या संख्येने आहे. यादरम्यान युरोपियन युनियन भारताकडून एक स्थिर भागीदार म्हणून बघत आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर भारत आणि युरोपियन युनियनचे एकत्र येण्याचे दाट संकेत असल्याने हा पाकिस्तानला अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल. दहशतवादाविरोधात भारताची मजबूत साथ युरोपियन युनियन देऊ शकते, ज्यामुळे जागतिक पातळीवर पाकिस्तानवरील दबाव वाढू शकतो.