AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं! रशिया डोनाल्ड ट्रम्प यांना देणार तब्बल अब्जावधी डॉलर्स, व्लादिमीर पुतिन यांच्या निर्णयाने थेट..

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून रशियाविरोधात भूमिका घेत आहेत. रशियाला अडकवण्याचा प्रत्येक प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. ज्यामध्येच पुतिन यांनी घेतलेल्या एका निर्णयाने जगात खळबळ उडाली आहे.

जग हादरलं! रशिया डोनाल्ड ट्रम्प यांना देणार तब्बल अब्जावधी डॉलर्स, व्लादिमीर पुतिन यांच्या निर्णयाने थेट..
Donald Trump and Vladimir Putin
| Updated on: Jan 22, 2026 | 10:02 AM
Share

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका आणि रशियात तणाव आहे. युक्रेनला रशियाच्या विरोधात युद्धासाठी मदत करताना अमेरिका दिसली. हेच नाही तर ज्यावेळी हे युद्ध सुरू झाले, त्यावेळी कोणालाही अजिबात वाटले नाही की, हे युद्ध तब्बल इतकी दिवस चालेल. मात्र, फक्त अमेरिकेचा नाही तर सर्व नाटो देश युक्रेनला युद्धात मदत करत आहेत. काही दिवसांपूर्वीच बोलताना रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी स्पष्ट शब्दात म्हटले होते की, रशिया हा फक्त एकट्या युक्रेनसोबत युद्ध लढत नाही तर तो अख्ख्या नाटो देशांविरोधात युद्ध लढत आहे. रशियामुळे अमेरिकेचा भारतासह अनेक देशांवर थेट दबाव आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने मोठा टॅरिफ अमेरिकेने भारतावर लावला. हेच नाही तर अमेरिकेकडून रशिया युक्रेन युद्धाबाबत शांतता प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र, या शांतता प्रस्तावाला युक्रेनने मोठा विरोध केला. सुरूवातीला अमेरिकेनेच हे युद्ध पेटवले आणि आता दोन्ही देशांना शांतता प्रस्ताव दिला जात आहे.

रशियाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात त्यांच्या कच्च्या तेलावर आधारित आहेत. जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात रशिया कच्च्या तेलाची निर्यात करतो. मात्र, अमेरिकेकडून आता रशियाचे कच्चे तेलच टार्गेट करण्यात आले. परिणामी त्याचा थेट परिणाम रशियावर होत आहे. चीन आणि भारत रशियाचे कच्चे तेल सर्वाधिक घेत. मात्र, भारतावर रशियाचे तेल खरेदी न करण्यासाठी मोठे निर्बंध लादली आहेत.

यादरम्यान पुतिन यांनी मोठा डाव अमेरिकेच्या विरोधात टाकल्याचे बघायला मिळत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोठा गेम खेळला आहे. त्यांनी हे एक महत्वपूर्ण राजनैतिक पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेत गोठवलेल्या रशियन मालमत्तेचा वापर युक्रेनच्या युद्धग्रस्त भागांच्या पुनर्बांधणीसाठी केला जाऊ शकतो, असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.

यासोबतच त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावित ‘बोर्ड ऑफ पीस’साठी मोठी रक्कम दान करण्याचे वचनही दिले आहे. पुतिन यांनी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितले की, अमेरिकेत जप्त केलेल्या रशियन निधीतून 1 अब्ज डॉलर्स डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावित बोर्ड ऑफ पीसला देण्यास ते तयार आहेत. हा निधी ट्रम्प यांच्या योजनेचा एक भाग असणार आहे. हा मोठा प्रस्ताव ट्रम्प यांना पुतिन यांनी दिला आहे.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ