
प्रजासत्ताक दिनासाठी युरोपियन युनियन (EU) चे प्रमुख नेते भारतात येत आहेत. फक्त प्रजासत्ताक दिनानिमित्तच नाही तर यादरम्यान काही महत्वाचे करार देखील केली जाणार आहेत. संपूर्ण जगाच्या भारताकडे आहेत. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारताने अनेक देशासोबत व्यापार करार केली आहेत. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा हे दोघेही भारत दाैऱ्यावर येत आहेत. नरेंद्र मोदी भारताच्या वतीने 16 व्या भारत-ईयू शिखर परिषदेचे सह अध्यक्षत्व करतील. यादरम्यान युरोपियन नेते उपस्थित असतील. हे भारतासाठी मोठे यश असल्याचेही बोलले जात आहे. भारत EU संबंध कोणत्याही एका सदस्य देशापुरते मर्यादित नाहीत तर संपूर्ण EU सोबत एक धोरणात्मक भागीदारी म्हणून पाहिले जाते.
26 जानेवारीच्या कार्यक्रमाकडे सर्व जगाच्या नजरा
युरोपियन युनियनच्या नेत्यांचा दौरा 25 ते 27 जानेवारी 2o26 दरम्यान आहे. 26 जानेवारी रोजी उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा नवी दिल्ली येथे 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडला संबोधित करतील. 25 ते 27 जानेवारी दरम्यान अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल आणि काही महत्वाचे करार होण्याचे देखील यादरम्यान संकेत आहेत.
महत्वाचे करार होण्याचे मोठे संकेत
आता तब्बल 9 वर्षानंतर 2022 मध्ये पुन्हा झालेल्या एफटीए वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहे. शिखर परिषदेदरम्यान करार अंतिम होण्याची शक्यता आहे. हा करार 27 देशांच्या युरोपियन युनियन आणि सुमारे दोन अब्ज लोकसंख्या असलेल्या भारत यांच्यात 90 टक्क्यांहून अधिक वस्तूंवरील शुल्क रद्द करण्यासाठी आणि सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे.
90 टक्क्यांहून अधिक वस्तूंवरील शुल्क रद्द होण्याचे संकेत
आता नेमके काय काय करार होतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. अमेरिकेने भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावला, ज्यानंतर अनेक देश भारताच्या मदतीला धावून आले. अमेरिकेने भारतावर इतक्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावूनही भारतावर काहीच परिणाम झाला नाही. भारताने रशियासोबत मोठा व्यापार करार केला. इतरही देशांसोबत मुक्त व्यापार करार केली.