
इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ आता इतर देशांना देखील पोहोचू लागली आहे, इ्स्रायलचे राष्ट्राध्यक्ष नेतन्याहू यांनी हमासला जगातून पूर्णपणे नष्ट करण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे जीथे -जीथे हमास नेता लपून बसले असतील त्या सर्व जागांवर आम्ही हल्ला करणार असं इस्रायलने म्हटलं आहे, आणि इस्रायलने ते खरं देखील करून दाखवलं आहे. इस्रायलकडून कतारची राजधानी असलेल्या दोहा येथे मोठा हल्ला करण्यात आला आहे. कतार सोबत अमेरिकेनं नुकतीच एक मोठी व्यापारी डील केली आहे, अशा परिस्थितीमध्ये इस्रायलकडून कतारवर हल्ला करण्यात आला आहे.
कतार हा नाटोचा सदस्य देश आहे, सोबतच अमेरिकेनं कतारसोबत काही ट्रिलियन डॉलरचा व्यापारी करार केला आहे. एवढंच नाही तर कतारमध्ये अमेरिकेचा बेस देखील आहे. त्यामुळे इस्रायलने कतारवर हल्ला करू नये, असं अमेरिकेला वाटत होतं. या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायला इशारा देखील दिला होता, की कतार हे आमचं मित्र राष्ट्र आहे, जरा जपून, कतारवर हल्ला करू नका. मात्र इस्रायलने डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याला केराची टोपली दाखवत कतारच्या राजधानीवर हल्ला केला आहे. हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. इस्रायलने 31 ऑगस्ट रोजीच मोठी घोषणा केली होती, हमासचे प्रमुख नेते हे विदेशात जाऊन लपले आहेत, मात्र ते जिथे कुठे असतील तीथे आम्ही पोहोचणार त्यांच्यावर हल्ला करणार, आणि इस्रायलने आपला दावा खरा देखील करून दाखवला आहे. कतारवर इस्रायलने हल्ला केला आहे.
दरम्यान आता पुढचा नंबर पाकिस्तानचा मित्र असलेल्या तुर्कीचा असू शकतो, कारण तुर्कीने हमासच्या अनेक नेत्यांना सध्या आश्रय दिलेला आहे. त्यामुळे तुर्कीवर कधीही इस्रायलचा हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता आहे. त्यामुळे सध्या मुस्लिम राष्ट्र दहशतीखाली असून, लवकरच इस्लामिक समिट बोलावली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुस्लिम राष्ट्रांकडून आता अमेरिकेवर दबाव निर्माण केला जात आहे की त्यांनी इस्रायलच्या कारवाया थांबाव्यात.
परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा देऊन देखील इस्रायलने कतारवर हल्ला केला आहे, कतारमध्ये अमेरिकेचे बेस आहे, इस्रायलचे मिसाईल कोणत्याही क्षणी अमेरिकेच्या बेसपर्यंत पोहचू शकतात अशी परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा युरोपमध्ये युध्दाचा भडका उडण्याची शक्यता आहे.