भारताला ज्याची भीती तेच घडतंय, मोठं संकट, थेट 200 डॉलर प्रति बॅरलपर्यंत..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच एका मागून एक मोठे आणि धक्कादायक दावे केले जात आहेत. जगावर मंदीचे सावट आहे. मात्र, इराण आणि अमेरिका काही हार मानताना दिसत नाहीत.

भारताला ज्याची भीती तेच घडतंय, मोठं संकट, थेट 200 डॉलर प्रति बॅरलपर्यंत..
crude oil
| Updated on: May 22, 2026 | 1:49 PM

इराण आणि अमेरिका युद्धात जग संकटात आहे. त्यामध्येच नुकताच आलेल्या रिपोर्टने एकच मोठी खळबळ उडवली. भारतासमोर मोठे संकट उभे आहे. ज्याचा परिणाम सामान्य लोकांवर होऊ शकतो. अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम होईल. रिपोर्टमध्ये स्पष्ट सांगण्यात आले की, होर्मुज खाडी तोपर्यंत बंद राहणार जोपर्यंत कच्च्या तेलाचा भाव 200 रूपये प्रति बॅरल होत नाही. यामुळे जगभरात मंदी येईल. फेब्रुवारी 2026 मध्ये होर्मुज खाडी बंद झाली, होर्मुज खाडी बंद झाल्यापासून जागतिक मार्केटमध्ये मोठा तणाव आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने ऊर्जेचे संकट आहे. शिवाय स्थिती अधिक नाजूक होत आहे. रिपोर्टनुसार, सध्याच्या घडीला खाडी देशांमध्ये 1.1 करोड बॅरलपेक्षा जास्त तेल आणि कंडेनसेटचे उत्पादन ठप्प आहे. एलपीजी गॅसचा 20 टक्के हिस्सा या युद्धात टार्गेट करून हल्ला करण्यात आल्याने उत्पादन ठप्प आहे.

जर जून 2026 पर्यंत काही निराकरण निघाले नाही तर ब्रेंट क्रूडच्या किमती 80 डॉलर प्रति बॅरल जाऊ शकतात. जर परिस्थिती अशीच राहिली तर जगावर मोठी मंदी येऊ शकते. 2026 मध्येच होर्मुज खाडीतील परिस्थिती बदलली नाही तर मंदीशिवाय दुसरे काहीच जगाच्या हातात शिल्लक राहणार नाही. भारत जगातील सर्वात मोठा तिसरा ऊर्जा आयात करणारा देश आहे.

भारताला ऊर्जेक‍रिता आखाती देशांशिवाय पर्याय नाही. आखाती देशात शांतता राहणे हे भारतासाठी कधीही चांगले आहे. जर कच्च्या तेलाच्या किमती 200 डॉलरपर्यंत पोहोचल्या तर हा भारताकरिता मोठा झटका म्हणावा लागेल. डॉलरच्या तुलनेत रूपया सतत घसरत राहिल. यासोबतच सरकारवर सबसिडीचा मोठा ताण निर्माण होईल. पुड मॅकेंजीचे प्रमुख अर्थशास्त्री पीटर मार्टिन यांनी म्हटले की, होर्मुज खाडी जागतिक बाजाराकरिता अत्यंत महत्वाची आहे.

होर्मुज खाडी बंद म्हणजे जागतिक बाजारावर मोठे संकट आहे. होर्मुज खाडी जितके दिवस बंद तितके ऊर्जेचे संकट आणि कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होणार. इराण आणि अमेरिका युद्ध थांबून लवकरात लवकर होर्मुज खाडी सुरळीत सुरू होणे, हे आता अत्यंत महत्वाचे बनले आहे. जर स्थिती अशीच राहिली तर मंदीशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही.

Follow Us