
why world is buying gold: गेले काही महिने सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहेत. कधी भाव गगनाला भिडत आहेत तर कधी अचानक त्यात घसरण होत आहे. लोकांना वाटत असेल की लग्नाचा सिझन आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. परंतू सत्य परिस्थिती घाबरवणारी आहे. हा खेळ केवळ सोने आणि चांदीचा नाही तर ही कहाणी आहे जगातील महाशक्तींच्या दरम्यान सुरु असलेल्या अदृश्य युद्धाची आहे. संपूर्ण जगात सध्या सोने खरेदीसाठी इतकी घायकुती सुरु आहे, जी आधी कधीच पाहायला मिळालेली नाही. चीनने त्याच्या तिजोरीत २३०३ टन सोने जमा केले आहे आणि भारतही मागे नाही, भारताकडे ८८० टन सोन्याचा साठा राखीव आहे.परंतू हे काही अचानक घडलेले नाही. यामागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक रणनीतीची भीती म्हटली जात आहे. तसेच अमेरिकेच्या डॉलरवरील ढासळता विश्वास यामागे आहे. चला तर पाहूयात जग आता...