
India-European Union: भारत आणि युरोपियन संघात काल ऐतिहासिक करार झाला. या कराराने युरोप आणि भारत अगदी जवळ आले आहे. तर जगाला कह्यात घेण्याची स्वप्न पाहणाऱ्या अमेरिकेला हा जबरी धक्का मानण्यात येत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिका जगात एकटी पडत चालली आहे. भारता सारख्या खास मित्राला नाहक डिवचण्याचे धाडस अमेरिकेने केले. भारताला कोंडीत पकडण्यासाठी बांगालदेशात सत्तांतर घडवून आणले. श्रीलंकेला चिथावणी दिली. तर नेपाळसह पाकिस्तानला हाताशी धरले. नेपाळ आणि श्रीलंकेने वेळीच धोका ओळखला. पाकिस्तानला बांग्लादेश ताब्यात घेण्याची स्वप्न पडू लागली आहे. ही स्वप्न त्याला किती महागात पडतील हे अगदी काही दिवसात समोर येईलच. तर दुसरीकडे अमेरिकेला मोठा हादरा देणे आवश्यक होते. ते काम मोदी सरकारने नेटानं केलं. गेल्या काही वर्षांपासून अडकलेल्या करारावर काल शिक्कामोर्तब झाले. भारत आणि युरोपियन संघात ऐतिहासिक करार झाला. या कराराला मदर्स ऑफ ऑल डील असं म्हटल्या जात आहे. अमेरिकेच्या सिंहासनाला या कराराने हादरा दिला. अमेरिकेच्या दादागिरीला हे एक उत्तर मानलं जात आहे. पण ही युरोपियन यूनियन,...