
Donald Trump UN Board Of Peace: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरीपणाचा संपूर्ण जगालाच फटका बसत आहे. अगोदर देशादेशात भांडणं लावायची आणि मग ती थांबवल्याचा कांगावा करायचा ही जुनी ब्रिटिश वसाहतवादी धोरणं त्यांनी गेल्या एका वर्षात जगभरात राबवली. आता तर बळजबरीने नोबेल पुरस्कारही हिसकावून घेतला. स्वतःच्या कंपन्या, व्यापार जगभरात पसरवण्यासाठी ट्रम्प अमेरिकन प्रशासनाचा पद्धतशीर वापर करत असल्याची विरोधकांची ओरड आहे. ट्रम्प यांच्या डोळ्यात गेल्या काही दिवसांपासून संयुक्त राष्ट्रसंघ(United Nation) खुपत आहे. जगातील विविध देशांच्या या संघटनेला अमेरिकेकडून मोठी रसद मिळत होती. ती त्यांनी बंद केली. आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुळावरच घाव घालण्याचा डाव ट्रम्प यांनी सुरू केला आहे. त्यासाठी बोर्ड ऑफ पीस (Board Of Peace) या गोंडस नावाने ते अमेरिकेचा साम्राज्यवादी राक्षस प्रत्येक देशाच्या मानगुटीवर बसवू पाहत आहे. बोर्ड ऑफ पीस नव्हे लूट! ...