
इराण येथे सर्वोच्च नेते आयातुल्लाह अली खामेनेई यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. इराणी महिला त्यांच्या स्वातंत्र्यासाठी सातत्याने निदर्शने करीत आहेत. तर इराणने आरोप केला आहे की अमेरिकेला खुश करण्यासाठी इराणमध्ये निदर्शने सुरु असून अशी निदर्शने करणाऱ्या लोकांना धडा शिकवला जाणार असल्याचे म्हटले आहे. आपल्या लहान मुलांना या निदर्शनांपासून दूर ठेवावे असे आवाहन इराण सरकारने केले असून नंतर जर गोळ्या लागल्या तर तक्रार करु नका असेही इराणच्या सरकारने म्हटले आहे. आता इराणमध्ये निदर्शनात ११६ लोक ठार झाले आहेत तर २६०० लोकांना अटक झाली आहे.
इराणची स्थिती पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत लिहिले की हे इराणच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. त्यांनी इराणच्या सरकारला इशारा देताना सांगितले की जर निदर्शकांवर गोळ्या चालवल्या तर याचे उत्तर अमेरिकन सरकार देईल. यानंतर आता असा अंदाज लावला जात आहे की लवकरच अमेरिका इराणवर हल्ला करु शकतो. ट्रम्पने अलिकडे इराणवर सैन्य हल्ल्याच्या विविध पर्यायांची ब्रिफिंग दिली आहे. त्यात तेहराणच्या बिगर सैनिक स्थळांवरील हल्ल्याचा उल्लेख आहे.
अमेरिकेने अलिकडेच व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना अनेकदा इशारा दिल्यानंतर अखेर अटक केली. मादुरो यांच्या सोबत त्यांच्या पत्नीला देखील अटक करण्यात आली आहे. दोघा पती-पत्नींना अमेरिकेच्या डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवले आहे. त्यानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेल कंपन्यांना नियंत्रित करण्याचा इशारा देखील दिला आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणवर देखील हल्ल्याची धमकी दिली आहे. आता अमेरिका इराणवर हल्ला करण्याच्या बेतात असल्याचे म्हटले जात आहे. परंतू, अमेरिकेला इराणवर सैन्य कारवाई करणे व्हेनेझुएला सारखे सोपे नाही, त्यामुळे अमेरिका इराणवरील स्थानिक सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ठाण्यांवर हल्ला करु शकते. कारण, इराणचे हे पोलिस निदर्शकांवर गोळीबार करत आहेत. मात्र, असे केल्यानंतर इराण देखील उत्तरादाखल कारवाई करु शकतो. इराणच्या कारवाईने अमेरिका, इस्राईलसह अनेक देशांचे नुकसान होऊ शकते.
इराणने अमेरिकेने जर हल्ला केला तर तो देखील अमेरिकेच्या सैन्य अड्ड्यांवर, जहाजांवर आणि इस्राईलवर उत्तरादाखल कारवाई करु शकतो. तज्ज्ञांच्या मते जर इराणवर हल्ला झाला तर अमेरिका आणि इस्राईलला सैन्य, आर्थिक आणि मानवीहानीचे नुकसान होऊ शकते. इराण अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या कतार येथील अल उदेद बेस आणि इस्राईलवर मिसाईल वा ड्रोन हल्ले करु शकतो. इराणकडे बॅलेस्टीक मिसाईल आणि प्रॉक्सी मिलिशिया सारखे हेजबोल्लाह, हुती असे हल्लेखोर गट आहेत. जे या आखात अस्थिरता तयार करु शकतात. काऊन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सच्या अनुसार मध्य पूर्वमध्ये अमेरिकेकडे एकूण १९ सैन्य तळ आहेत. यातील आठ कायम स्वरुपी बेस आहेत. बहारीन, इजिप्त, इराक, जॉर्डन, कुवैत, कतार, सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरात येथे हे कायम स्वरुपाचे लष्करी तळ आहेत.इराण या सैन्य तळांना लक्ष्य करु शकते.
इराणवर हल्ला झाला तर मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या सुमारे ४० हजाराहून अधिक सैनिकांना धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय सायबर हल्ले वा अतिरेकी कारवाया होऊ शकतात. इराणच्या तर्फे इस्राईलवर थेट मिसाईल हल्ले होऊ शकतात. यामुळे इस्राईलची मोठे नुकसान होऊ शकते. इराण स्ट्रेट ऑफ होमुर्जला ब्लॉक करु शकतो. या मार्गातून जगाच्या २० इंधनाची वाहतूक होते. यामुळे गॅस, पेट्रोल सारख्या इंधनाच्या किंमत आकाशाला भिडू शकतात. त्यामुळे अमेरिका, इस्राईल यांच्या अर्थव्यवस्था त्यामुळे प्रभावित होऊ शकतात. यामुळे भारतात देखील इंधनाच्या किंमती वाढू शकतात.
सौदी अरब, युएई आणि कतारच्या तेल क्षेत्रांवरील हल्ल्या जागतिक ऊर्जा बाजार अस्थिर होऊ शकतात. या शिवाय स्थलांतरीतांचे संकट वाढू शकते. जे दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरचे सर्वात मोठे संकट होऊ शकते. या हल्ल्यामुळे अमेरिकेचे राजकीय विभाजन आणि आंतरराष्ट्रीय टीकेचा सामना होऊ शकतो. एकूण इराणवर अमेरिकेच्या हल्ल्याच्या मुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे लाखो लोकांचा मृ्त्यू खतरा होऊ शकतो. याशिवाय अमेरिकेची ट्रिलियन डॉलरची आर्थिक हानी आणि दीर्घकाळापर्यंत चालणारी अस्थिरता निर्माण होऊ शकते.
अमेरिकेने कधी इराणवर कधी उघडपणे युद्ध लढलेले नाही. परंतू अनेक वेळा सैन्य वा गुप्त कारवाई केली आहे. ही कारवाई मुख्य रुपाने इराणचा आण्विक कार्यक्रम, अतिरेकी क्षेत्रीय प्रभाव रोखण्यासाठी केली होती.
1953: सीआयए द्वारा समर्थित सत्तापालट, ज्यामुळे इराणी पंतप्रधान मोहम्मद मोसद्देक यांना हटवले
1980-1988 (इराण-इराक युद्ध): अमेरिकेने इराकला समर्थन देत, इराणी जहाजांवर हल्ले केले आहेत. (ऑपरेशन प्रेईंग मंटिस), आणि 1988 मध्ये इराणी प्रवासी विमान चुकीने पाडल्याने एकूण 290 प्रवासी ठार झाले होते.
2020: इराणी जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात ठार केले होते.
2025: इराणच्या आण्विक स्थळांवर हल्ले ( ऑपरेशन मिडनाईट हॅमर ), जे इस्राईलसोबत युद्धाचा भाग होते.
इराण आणि अमेरिकेवर हल्ला झाला तर मुख्य रुपाने आर्थिक आणि रणनीतीक प्रभाव पडू शकतो. कारण भारत इराणशी ऐतिहासिक रुपाने जोडलेला आहे. आणि इंधनासाठी मोठ्या प्रमाणावर मध्य पूर्वेशी अवलंबून आहे. भारता आपल्या गरजेचे 40-50% कच्चे तेल मध्य पूर्वेतून आयात करतो. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्याने तेलाच्या किंमती वाढू शकतात. ज्यामुळे भारताचा जीडीपी वृद्धी 0.3% कमी होऊ शकते. आणि चलनदरात 0.4% वाढू शकते. इराणहून इंधन आयात आधीच निर्बंधापासून प्रभावित आहे. परंतू युद्धामुळे संपूर्ण पुरवठा साखळी प्रभावित होऊ शकते. यामुळे शेअर बाजारात घसरण, चलन कमजोरी आणि व्यापारी मार्गात बाधा निर्माण होऊ शकते. भारताची निर्यात ( रसायन, तांदुळ ) प्रभावित होऊ शकते.
या स्थितीत भारतात अमेरिका, इस्राईल आणि इराणच्या दरम्यान संतुलन बनवणे गरजेचे आहे. भारत इराण सोबत चाबहार बेट आणि व्यापार करतो. तर इस्राईलकडून संरक्षण साहित्य खरेदी करतो. युद्धामुळे क्षेत्रीय अस्थिरता वाढेल. ज्यामुळे या क्षेत्रात कामानिमित्त राहणाऱ्या भारतीय स्थलांतरीत ( मध्य पूर्वेत 90 लाख भारतीय ) नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण होऊ शकतो. युद्ध झाल्यानंतर भारत तटस्थ राहू शकतो. परंतू ऊर्जा संकटाशी निपटण्यासाठी रशिया वा अन्य स्रोतावरील अवलंबित्व वाढेल.यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. परंतू भारतीयांच्या लवचिक परराष्ट्र नितीमुले याच्याशी मुकाबला करणे शक्य होऊ शकते.