
Explainer: अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा संघर्षाने कळस गाठला आहे. अफगाणिस्तानने त्याच्यावर केलेल्या एअर स्ट्राईकचा बदला घेत सीमेवर सुरु केलेल्या मोहिमेत पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार केले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानवर बॉम्ब हल्ल्याचा आरोप केला होता. राजधानी काबूल आणि देशाच्या पूर्वेकडील बाजाराला टार्गेट करुन हा हल्ला करण्यात आला होता. तालिबान सरकारचे मुख्य प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद यांनी दावा केला आहे की अफगाणच्या सेनेने २५ पाकिस्तानी सैन्य चौक्यांवर कब्जा केला आहे, ५८ सैनिक मारले गेले आहेत आणि ३० सैनिक जखमी झाले आहेत. या लेखात आपण सध्याचा संघर्ष सुरु होण्याची कारणे आणि अफगाण आणि पाकिस्तानच्या दरम्यानच्या संघर्षाचा इतिहास यासंदर्भात माहिती घेणार आहोत. संघर्षाचा प्रदीर्घ इतिहास – अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे संबंध केव्हाच चांगले राहिलेले नाहीत. दोन्ही देशांमध्ये संघर्षाचा इतिहास प्रदीर्घ आहे. अलिकडच्या दिवसात हा संघर्ष वाढला आहे. याला कारण आहे पाकिस्तानच्या त्यांच्या भागातील अतिरेकी हल्ल्यांना तहरीक-ए-तालिबान...