अमेरिकेत संसदेवर हल्लाबोल, डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊण्ट लॉक, कायमस्वरुपी बंदीचा इशारा

| Updated on: Jan 07, 2021 | 7:59 AM

डोनाल्ड ट्रम्प आपले तीन ट्विट्स डिलीट करत नाहीत, तोपर्यंत त्यांचे अकाऊण्ट लॉक्ड राहील, असं ट्विटरने स्पष्ट केलं Twitter Block Donald Trump

अमेरिकेत संसदेवर हल्लाबोल, डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊण्ट लॉक, कायमस्वरुपी बंदीचा इशारा
Follow us on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना ट्विटरवर कायमची बंदी आणण्याचा इशारा देण्यात आला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊण्ट बारा तासांसाठी, तर फेसबुकने 24 तासांसाठी लॉक केले आहे. नागरी अखंडत्वाबद्दल नियम मोडणारे तीन ट्विट्स डिलीट न केल्यास ट्रम्प यांच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याचा इशारा ट्विटरने दिला. (Facebook Twitter Block Donald Trump account after US Capitol Attack)

ट्विटर सुरक्षा टीमच्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प आपले तीन ट्विट्स मागे घेत नाहीत, किंवा डिलीट करत नाहीत, तोपर्यंत त्यांचे अकाऊण्ट लॉक्ड राहील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकन कॅपिटल भवनाबाहेर जोरदार निदर्शनं केली होती. समर्थक आणि पोलिसांमध्ये यावेळी जोरदार झटापट झाली.

“वॉशिंग्टन डीसीमध्ये उद्भवलेल्या हिंसक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे तीन ट्वीट्स हटवावेत, अशी आमची मागणी आहे. नागरी अखंडत्व धोरणाचे वारंवार आणि गंभीर उल्लंघन त्यांनी केलं आहे” असं ट्विटरने म्हटलं आहे. ट्विट्स न हटवल्यास ट्रम्प यांचे अकाऊण्ट लॉक राहील, असंही ट्विटरने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थकांना हिंसा न करण्याचं आवाहन केलं. पोलीस आपल्या बाजूने आहेत. आपला पक्ष कायद्याने चालणारा आहे, मला कुठलाही हिंसाचार नको, असं ट्रम्प यांनी समर्थकांना संबोधित करताना म्हटलं.

बायडन यांच्याकडून शांततेचं आवाहन

संविधानाचं रक्षण करत अमेरिकेत उफाळलेला हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय वाहिनीवरुन समर्थकांना शांततेचं आवाहन करावं, असं वक्तव्य अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी केलं.

संबंधित बातम्या :

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेत घट, बायडन यांचे 15 लाख फॉलोअर्स वाढले

(Facebook Twitter Block Donald Trump account after US Capitol Attack)