इराण-अमेरिका युद्ध थांबले, अखेर डोनाल्ड ट्रम्प झुकलेच, शांती करारातील या 14 अटी वाचा..

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध संपले आहे. युद्धकरार झाली आहेत. अखेर इराणने अमेरिकेला झुकवल्याचे बघायला मिळत आहे. 14 करारांवर ही युद्धबंदी झाली. 14 अटी ठेवण्यात आल्या. या अटी नक्की कोणत्या हे जाणून घ्या.

इराण-अमेरिका युद्ध थांबले, अखेर डोनाल्ड ट्रम्प झुकलेच, शांती करारातील या 14 अटी वाचा..
Donald Trump and Iran
| Updated on: Jun 15, 2026 | 8:17 AM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर जाहीर केले की, इराण आणि अमेरिका यांच्या युद्धविराम करार पूर्ण झालीत. होर्मुज खाडी खुली आहे. अमेरिका तात्काळ इराणची तटबंदी काढत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सैन्याला परत बोलावले. अखेर तीन महिन्यापेक्षाही अधिक काळापासून सुरू असलेले हे युद्ध थांबले आहे. 19 जून 2026 रोजी दोन्ही देश करारावर सह्या करतील. इराण आणि अमेरिका युद्ध थांबल्याने जगाला मोठा दिलासा मिळाला. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या होत्या. अखेर आज या युद्धविरामाची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. या युद्धविराम 14 अटींवर मान्य करण्यात आला. या 14 अटी नक्की कोणत्या हे जाणून घेऊयात.

इराण आणि अमेरिका युद्धातील या 14 युद्धविराम करार अटी खालीलप्रमाणे-

1- इराणचे तेल आणि पेट्रोकेमिकल्सवरील अटी हटवल्या जातील.

2- इराणच्या वित्तीय संसाधनोना पूर्ण अधिकार मिळेल, अमेरिकेने यावर निर्बंध लादले होते.

3- 60 दिवसांमध्ये इराणचे जे 24 अरब डॉलर गोठण्यात आली होती, त्यावरील निर्बंध काढले जातील.

4- इराणच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिका आणि तिच्या मित्रराष्ट्रांना सुमारे 300 अब्ज डॉलर्सच्या योजना सादर कराव्या लागतील.

5- लेबनानसह सर्व युद्ध तात्काळ बंद केले जाईल.

6- अमेरिका इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे आणि इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचे वचन देईल.

7- अमेरिकेने जी नाकेबंदी इराणजवळ लावली ती 30 दिवसाच्या आत पूर्णपणे हटवेल.

8- अमेरिकेचे सैन्य इराणच्या कोणत्याही भागात राहणार नाही आणि तिथून निघून जाईल.

9- होर्मुज खाडी पूर्ण सुरक्षेचा विचार करत 30 दिवसांच्या आत पुन्हा सुरू होईल.

10- अणुविषयक मुद्द्यांवर आणि निर्बंध पूर्णपणे उठवण्याबाबत अंतिम करारापर्यंत पोहोचण्यासाठी 60 दिवसांचा वाटाघाटींचा कालावधी सुरू होईल.

11- इराण अणुशस्त्रे न बनवण्याबाबतच्या आपल्या NPT अणुप्रसारबंदी करार अंतर्गत असलेल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करेल.

12- अमेरिका या प्रदेशातील आपली लष्करी उपस्थिती न वाढवण्यास किंवा नवीन निर्बंध न लादण्यास सहमती दर्शवेल.

13- अंमलबजावणी पाहण्यासाठी एक देखरेख यंत्रणेची व्यवस्था केली जाईल. कोणत्याही अंतिम कराराला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाद्वारे मान्यता दिली जाईल.

14- इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि तिथल्या रेझिस्टन्स ग्रुप्सना मिळणारा पाठिंबा हे या कराराचा भाग नाहीत.

Follow Us