AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसचे दर होणार कमी, इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार, थेट..

3 महिन्यापेक्षाही अधिक काळापासून इराण आणि अमेरिका युद्ध सुरू होते. अखेर युद्ध थांबले आहे. जगाने सुटकेचा निश्वास घेतला. इराण आणि अमेरिका युद्धात जगाची पार वाट लागली होती. त्यामध्येच आता ही आनंदाची बातमी आहे. होर्मुज खाडीही खुली करण्यात आली.

आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसचे दर होणार कमी, इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार, थेट..
Iran and America war Petrol and LPG gas
| Updated on: Jun 15, 2026 | 7:46 AM
Share

जगासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ज्याची प्रतिक्षा संपूर्ण जग करत होते, अखेर ते घडले आहे. 3 महिन्यापेक्षाही अधिक काळापासून इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू होते. अखेर इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबले आहे. दोन्ही देशात युद्धविराम करार निश्चित झाला. होर्मुज खाडीही सुरू झाली. अमेरिकेने तात्काळ इराणच्या भोवतीची नाकेबंदी हटवणार असल्याचे स्पष्ट केले. अखेर संपूर्ण जगाने सुटकेचा निश्वास घेतला. इराण आणि अमेरिका युद्धात जगाची वाट लागली होती. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगणाला पोहोचत होते. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम झाला. स्ट्रेट ऑफ होर्मुझवरील अमेरिकेची नौदल नाकेबंदी त्वरित उठवली जाईल, असे अमेरिकेने स्पष्ट केले. या युद्धादरम्यान भारतात चाैथ्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ झाली. हेच नाही तर एलपीजी गॅस सिलेंडरच्याही भावात वाढ झाली. एलपीजीचा तुटवडा होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की, होर्मुज खाडी खुली झाली आहे. सुरक्षितपणे जहाजे होर्मुज खाडीतून ये-जा करू शकतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली. यासोबतच या युद्धात मध्यस्थी करणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. ट्रम्प यांच्या पोस्टनंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी देखील एक पोस्ट शेअर केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, इराणसोबतचा करार आता पूर्ण झाला आहे. सर्वांचे अभिनंदन… मी होर्मुझची खाडी कोणत्याही करांशिवाय पूर्णपणे खुली करण्यास आणि त्याचवेळी अमेरिकेची नौदलाची नाकेबंदी त्वरित उठवण्यास अधिकृत मंजुरी देत ​​आहे. जगभरातील जहाजांनी आपली इंजिने सुरू करावीत, तेलाचा पुरवठा सुरू होऊ द्या, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

19 जून 2026 रोजी स्वित्झर्लंडमध्ये इराण आणि अमेरिका युद्धविराम करारावर सह्या करतील. त्यापूर्वीच अमेरिकेने इराणची होर्मुज खाडी खुली असून अमेरिकेच्या लष्कराची तटबंदी हटवत असल्याचे जाहीर केले. ही जगासाठी आनंदाची बातमी आहे. दोन्ही देशात अखेर युद्धविराम करार झाली आहेत. त्यावर दोन्ही देशाने सहमती दर्शवली आहे. शेवटी 19 जूनला त्यावर सह्या केल्या जातील. जागतिक बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलाचे भाव घसरले आहेत. भारतात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी