अमेरिकेत पुन्हा एकदा शाळेत फायरिंग; अंधाधुंद गोळीबारात तीन विद्यार्थ्यांसह 4 कर्मचारी ठार…

| Updated on: Mar 28, 2023 | 12:02 AM

शाळेतील 200 विद्यार्थी उपस्थित होते. या हल्ल्यावेळी शाळेत नर्सरीपासून सहावीपर्यंतचे सुमारे 200 विद्यार्थी उपस्थित होते. नेमकं त्याच महिला आली आणि दुर्घटना घडली.

अमेरिकेत पुन्हा एकदा शाळेत फायरिंग; अंधाधुंद गोळीबारात तीन विद्यार्थ्यांसह 4 कर्मचारी ठार...
Follow us on

नवी दिल्ली : अमेरिकेत पुन्हा एकदा शाळेत गोळीबार झाल्याची गंभीर घटना घडली आहे. अमेरिकेतील एका खासगी शाळेत केलेल्या गोळीबारामुळे तीन मुलांसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेच्या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोरही ठार झाला आहे. एका खाजगी नॅशव्हिल ग्रेड स्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात तीन मुले आणि तीन नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत महिला हल्लेखोरही ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ॉ

अमेरिकेत सोमवारी एका महिला हल्लेखोराने टेनेसीच्या नॅशविले येथील शाळेत अंदाधूंद गोळीबार केला. यावेळी तिने पिस्तुलमधून तिने अनेक वेळा गोळ्या झाडल्या आहेत.

तर दुसरीकडे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलीस दाखल होईपर्यंत अनेक जणांचा त्यामध्ये जीव गेला होता. या घटनेत हल्ला करणाऱ्यासह 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

या गोळीबारात तीन मुलांशिवाय शाळेतील तीन कर्मचाऱ्यांचाही जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचवेळी संशयित महिला हल्लेखोराचाही पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला असून या घटनेत एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

शाळेतील 200 विद्यार्थी उपस्थित होते. या हल्ल्यावेळी शाळेत नर्सरीपासून सहावीपर्यंतचे सुमारे 200 विद्यार्थी उपस्थित होते. या हल्ल्यानंतर, जखमी मुलांना उपचारासाठी मनरो कॅरेल ज्युनियर चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.