AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेतून भारताचे काैतुक, युरोपियन युनियनसोबतच्या करारावर पहिली मोठी प्रतिक्रिया, भारताला…

मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. भारतावर अमेरिकेने मोठा टॅरिफ लावला. यादरम्यानच भारताने थेट युरोपियन युनियनसोबत मोठे करार केली आहेत.

अमेरिकेतून भारताचे काैतुक, युरोपियन युनियनसोबतच्या करारावर पहिली मोठी प्रतिक्रिया, भारताला...
Donald Trump
| Updated on: Jan 28, 2026 | 9:11 AM
Share

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर अत्यंत मोठा टॅरिफ लावला. यामुळे भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात कमी झाली. भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार करण्यावर भर दिला. त्यामध्येच भारताने अमेरिकेला आता सळो की पळो करून सोडले आहे.  18 वर्षाच्या मोठ्या काळानंतर भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात करार झाले. ज्यामुळे भारतात काही वस्तू आता थेट स्वस्त होणार आहेत. काही उत्पादनांवरील कर कपात आणि थेट टॅरिफ रद्द करण्यावर सहमती झाली. भारतावर मागील काही काळापासून अमेरिकेचा प्रचंड दबाव आहे. त्यामध्येच भारताने अमेरिकेला मोठा धक्का दिला. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील ऐतिहासिक व्यापार करारानंतर अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया आलीये. अमेरिका या व्यापार करारांवर नक्की काय बोलणार याकडे संपूर्ण जगाच्या नजरा होत्या. शेवटी अमेरिकेने प्रतिक्रिया याबाबत दिली आहे.

अमेरिकेने या कराराला फायदेशीर म्हटले असून भारतासाठी हा करार खूप जास्त फायदेशीर असल्याचे अमेरिकेने स्पष्ट शब्दात म्हटले. अमेरिकेचे प्रतिनिधी ग्रीर यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, नक्कीच भारत या करारांमध्ये आघाडीवर राहिला आहे. त्यांच्या मते, भारताला युरोपीय बाजारपेठांमध्ये पूर्वीपेक्षा आता खूप जास्त प्रवेश मिळाला आहे .

फक्त हेच नाही तर भारतीय नागरिकांना युरोपमध्ये स्थलांतराच्या संधी वाढल्याचेही त्यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून भारतीयांना अमेरिकेत येऊन नोकऱ्या करण्यापासून रोखण्यासाठी H-1B व्हिसाच्या नियमात सातत्याने बदल केली जात आहेत. यासोबतच शुक्लामध्ये वाढ केली आहे. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील करारामुळे भारताला अनेक फायदे झाली आहेत.

नक्की कोण कोणते करार होणार याकडे जगाच्या नजरा होत्या. या करारांमुळे कारच्या किंमतीही कमी होणार आहेत. अमेरिकेकडून भारतावर निर्बंध लादले जात असतानाच भारताने ही अत्यंत मोठी बाजी मारल्याचे स्पष्ट दिसत आहे. युरोपियन युनियनचे प्रमुख भारताच्या दाैऱ्यावर होते. 26 जानेवारीलाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणूनही त्यांनी उपस्थिती लावली होती.

Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?