इराणच्या साऊथ पार्सवरील इस्राईली हल्ल्यानंतर, इराणने दिलेल्या धमकीने जग हादरले

इस्राईलने इराणच्या जगातल्या सर्वात मोठ्या गॅस फिल्ड साऊथ पार्सवर हल्ला केल्याने आता युद्धाला व्यापक स्वरुप मिळाले आहे. आता इराणने देखील अरब देशांच्या तेल आणि गॅस फिल्डवर हल्ला करण्याची धमकी दिल्याने जगभरासह भारताचा गॅस पुरवठा बाधित होणार आहे.

इराणच्या साऊथ पार्सवरील इस्राईली हल्ल्यानंतर, इराणने दिलेल्या धमकीने जग हादरले
Iran's South Pars
| Updated on: Mar 20, 2026 | 5:20 PM

इस्राईलने बुधवारी रात्री इराणची जगातील सर्वात मोठी गॅस फिल्ड साऊथ पार्सवर हल्ला केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या हल्ल्याने चिडलेल्या इराण आता आखाती देशातील गॅस कंपन्यांवर हल्ले करणे सुरु केले असून त्यात सर्वात जास्त नुकसान कतारचे झाले आहे. या हल्ल्यामुळे जगाचा संपूर्ण गॅस पुरवठा अडचणीत आला आहे.

इराणने म्हटले आहे की त्याच्या सर्वात मोठ्या गॅस फिल्ड साऊथ पार्स प्रोडक्शन सेंटरवर इस्राईलने हल्ला केल्याने यास तो आता ‘पूर्ण आर्थिक युद्ध’ मानत आहे. साऊथ पार्स जगातला सर्वात मोठा नैसर्गिक गॅस फिल्ड असून ज्यास इराण आणि कतार एकत्रपणे वापरतात. हे ठिकाण दोन्ही देशांच्यामध्ये समुद्राच्या मधोमध स्थित आहे. आणि कतारच्या विशाल नॉर्थ फिल्डचा विस्तार मानला जाते.

साऊथ पार्सवरील हल्ल्यानंतर काही तासांतच इराणी मिसाईल कतारच रास लाफान भागात कोसळली. येथे लिक्विफाईड नॅचरल गॅसच्या रिफायनरीची केंद्र आहे. कतारच्या सरकारी गॅस कंपनीने दिलेल्या माहितीनुसार इराणच्या हल्ल्याने समुद्री मार्गाने गॅस पुरवठा करणारी जगातील सर्वात मोठी गॅस सिस्टीमचे मोठे नुकसान झाले आहे.

संपूर्ण जगाच्या पुरवठ्यावर परिणाम –

कतारच्या सरकारी तेल-गॅस कंपनी कतार एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी साद अल-काबी यांच्या मते इराणच्या हल्ल्यात गॅस कंपनीचे इतके नुकसान झाले आहे की त्यांना दुरुस्त करण्यास पाच वर्षे लागू शकतात. त्यामुळे जागतिक पुरवठ्याचे संकट दीर्घकाळ राहू शकते असे म्हटले जात आहे.

अल काबी यांनी म्हटले आहे की मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की रमजानच्या दिवसात एक मुस्लीम देश या प्रकारे हल्ला करेल. कतारच्या सरकारने दुजारो दिला की इराणने डागलेल्या पाच बॅलेस्टिक मिसाईलपैकी चारना रोखण्यात यश आले. मात्र, एक मिसाईल देशाच्या गॅस निर्यातीचे मुख्य केंद्र असलेल्या रास लाफान औद्योगिक परिसरात कोसळले. सरकारी प्रवक्त्याने सावधान करताना सांगितले की ऊर्जा ढाचाला निशाना करण्यात आले आहे. ग्लोबल एनर्जी सिक्युरिटी, क्षेत्राच्या लोक आणि पर्यावरणासाठी धोका म्हटला जात आहे.

कतारकडून आशियाई देशांना गॅस पुरवठा

गेल्यावर्षी कतार गॅसचा पुरवठा जगाच्या एलएनजी बाजाराच्या सुमारे पाचवा हिस्सा होती. ज्यातील ८० टक्के आशियातील विकसनशील देशांना पाठवण्यात आला होता. याची निर्यात जर दीर्घकाळ बाधित झाली तर जगभरातील गॅसच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. इराणच्या साऊथ पार्सवर झालेल्या हल्ल्यानंतर आता इराणच्या सरकारी मीडियाने इशारा दिला आहे की आता सौदी अरब, युएई आणि कतारच्या अनेक प्रमुख तेल आणि गॅसच्या ठिकाणांना टार्गेट करण्याचा आम्हाला हक्क आहे. या संभाव्य टार्गेटमध्ये सौदी अरबजवळील यनबू येथील सॅमरेफ रिफायनरी, जुबैल पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्स, युएईचा अल होसन गॅस क्षेत्र आणि कतारचा मेसाईद पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचा समावेश आहे.

Follow Us