AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य पूर्वेच्या आकाशात मोठा धोका, डीजीसीएने भारतीय एअरलाईन्सना केले अलर्ट, या ११ देशांच्या….

इराण युद्ध सुरु असताना डीजीसीए या संस्थेने मध्य पूर्वेतील एअरस्पेस संदर्भात भारतीय एअरलाईन्सना इशारा दिला आहे. या दरम्यान त्यांना ११ देशांच्या हवाई हद्दीला हाय रिस्क झोन घोषीत केले आहे. त्यामुळे मध्य पूर्वेतील आकाशात विमानांवर बंदी घातली आहे.

मध्य पूर्वेच्या आकाशात मोठा धोका, डीजीसीएने भारतीय एअरलाईन्सना केले अलर्ट, या ११ देशांच्या....
Iran war impact
| Updated on: Mar 20, 2026 | 4:08 PM
Share

इराणवर इस्राईल – अमेरिकेने २८ फेब्रुवारी रोजी मोठा हल्ला केला. त्यानंतर इराणने देखील आखातातील अरब राष्ट्रामधील अमेरिकन तळांना टार्गेट केले आहे. या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई सह अनेक नेते ठार झाले आहेत. आज युद्धाचा २१ वा दिवस आहे. हे युद्ध पेटले असताना आता डीजीसीएने (DGCA) भारतीय एअरलाईन्ससाठी एक महत्वाची सेफ्टी एडव्हायझरी जारी केली आहे. आता मध्य पूर्व आणि पर्शियन गल्फमधील हवाई क्षेत्रात वाढणाऱ्या धोक्या संदर्भात इशारा देत सावधान केले आहे. या एडव्हायझरीत म्हटले आहे की सध्याच्या परिस्थितीत या क्षेत्रात विमान चालवणे जोखीमीचे होऊ शकणार आहे. यामुळे एअरलाईन्स येथे अत्यंत सावधानता बाळगण्याची गरज आहे.

सर्वात मोठा धोका इराणकडून केले जात असलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईचा मानला जात आहे. अमेरिका आणि इस्राईलसह आजूबाजूच्या देशात यामुळे धोका व्यक्त होत आहे. दुसरा धोका मिसाईल आणि एअर सिस्टीमशी संबंधित आहे. या क्षेत्रातील उपलब्ध शस्रास्राना रोखण्यासाठी केलेल्या कारवाईच्या दरम्यान आजूबाजूच्या हवाई क्षेत्रातही धोका निर्माण होऊ शकतो.

DGCA ने काय दिला इशारा ?

Directorate General of Civil Aviation (DGCA) यांनी म्हटले आहे की येथे प्रत्येक उंचीवर काम करणारे एअर डिफेन्स सिस्टीम, क्रुझ मिसाईल आणि बॅलेस्टिक मिसाईल उपलब्ध आहेत. जे कोणत्याही क्षणी सक्रीय होऊ शकतात. चौथा धोका ऑपरेशनच्या त्रूटीचा आहे. म्हणजे कोणत्याही सिव्हील विमानाला चुकीने सैन्य टार्गेट समजून इंटरसेप्शन दरम्यान चूक झाली तर मोठा विमान अपघात होऊ शकतो असे म्हटले आहे.

DGCA चे काम काय असते ?

DGCA ही भारताच्या सिव्हील एव्हीएशन संबंधित सर्वात मोठी संस्था आहे. याचे काम देशाच्या हवाई प्रवासाला सुरक्षित, योग्य आणि नियमानुसार चालवणे आहे. डीजीसीए हवाई मंत्रालयाअंतर्गत काम करत असते. म्हणजे सरकारचा हा विभाग हवाई प्रवासा संदर्भात नियम बनवत असतो आणि त्याचे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवून असतो. डीजीसीएचे सर्वात मोठे काम हवाई सुरक्षा सुनिश्चित करणे हे आहे. ही संस्था हे निश्चित करते की विमान सुरक्षित उड्डाण करु शकेल आणि प्रवाशांना कोणताही धोका होऊ नये. यासाठी ही संस्था नियम तयार करत असते आणि विमान कंपन्यांना या नियमांचे पालन करावे लागते. ही भारतीय सिव्हील एव्हीशन संबंधित सर्वात महत्वाची संस्था आहे. हीचे काम देशातील हवाई प्रवास सुरक्षित करणे आणि योग्य आणि नियमानुसार विमानांचे काम करवून घेणे हे आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?