AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धातून अमेरिकेची अचानक माघार ? ४८ तासांत ३ युद्ध नौका इराणपासून दूर केल्या

इराणमधील युद्धातून माघार घ्यावी यासाठी अमेरिकेवर मोठा दबाव आहे. मध्य पूर्वेत तैनात असलेल्या तीन युद्धनौका अमेरिकेने माघारी घेतल्या आहेत. यापैकी 'जेराल्ड फोर्ड' या युद्धनौकेचाही समावेश आहे.

युद्धातून अमेरिकेची अचानक माघार ? ४८ तासांत ३ युद्ध नौका इराणपासून दूर केल्या
USS Gerald
| Updated on: Mar 19, 2026 | 11:37 PM
Share

इराणच्या युद्धातून गेल्या ४८ तासात अमेरिकेने त्याच्या तीन युद्धनौकांना हटवले आहे. यातील एक जेराल्ड फोर्ड विमानवाहू युद्ध नौका आणि २ माईन्स जहाजांचा समावेश आहे. या युद्धनौकाना अशा वेळी हटवण्यात आले आहे जेव्हा मध्य पूर्वेत इराण आणि अमेरिकेतील हे युद्ध दीर्घकाळ चालणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे अमेरिकेने या जहाजांना मध्य पूर्वेतून का हटवले यासंदर्भात अधिकृत निवेदन केलेले नाही. मात्र, या तीन युद्धनौकांना हटवण्याचे वेगवेगळे कारण म्हटले जात आहे. इराण या संपूर्ण प्रकरणात शांत आहे.

४८ तास तीन युद्धनौका हटवल्या

१ – सीएनएनच्या मते जेराल्ड फोर्ड नावाची युद्धनौका ओमानपासून दूर नेण्यात येत आहे. या जानेवारी महिन्यात इराणच्या नाकाबंदीसाठी या युद्धनौकेला ओमानच्या खाडीत तैनात करण्यात आले होते. परंतू आता तिला क्रेते येथील अमेरिकन नौदलाच्या अड्ड्यावर नेले जात आहे.

अमेरिकन संरक्षण दलातील सुत्रांनी सीएनएनला सांगितले की गेल्या आठवड्यात या युद्धनौकेला आग लागली होती. त्यानंतर हीचे अनेक भाग डॅमेज झाले होते. त्यांना दुरुस्त करण्यासाठीच या युद्धनौकेला क्रेते येथील नौदलाच्या तळावर नेले जात आहे. मात्र,या यु्द्धनौकेच्या बदल्यात कोणती युद्धनौका ओमान येथे पाठणार आहे किंवा दुरुस्ती झाल्यानंतर ही युद्धनौका पुन्हा कधी ओमान जाईल हे अमेरिकेने सांगितलेले नाही.

२ – फायनान्शियल टाईम्सच्या बातमीनुसार पाण्याखालील सुरुंगांना हटवणारे दोन अमेरिकन नौकांना मध्य पूर्वेतून मलेशियाला पाठवले जात आहे. दोन्हींचा सॅटेलाईट फोटो आला आहे.यातील एका नौकेचे नाव युएसएस तुलसा आणि दुसरीचे नाव युएसएस सांता असे आहे.

दोन्ही नौकाचा वापर पाण्यात पेरलेल्या सुरुंगांना काढण्यासाठी केला जातो. परंतू आता त्या होर्मुझ पासून ३,५०० किमी अंतरावर आहेत. आता त्यांना मलेशियात पाठवले गेले आहे. आता या कॅटेगरीचे एकच जहाज मध्य पूर्वेत तैनात आहे.

इराणच्या युद्धात अडकला अमेरिका –

ट्रम्प प्रशासन इराणच्या युद्धात अडकले आहे असे अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बाल्टन यांनी द डेली टेलिग्राफमध्ये एका लेखात म्हटले आहे. ते म्हणतात की अमेरिकेचा प्रयत्न युद्ध त्वरित समाप्त करण्याचा होता, परंतू इराणने अमेरिकेला अडकवून टाकले. आता ट्रम्प प्रशासनाकडे युद्ध समाप्त करण्याचा पर्याय नाही.

जर ट्रम्प प्रशासनाने कोणत्याही तोडग्याशिवायच युद्ध समाप्त झाल्याची घोषणा केली तर जगभर त्यांची नाचक्की होईल. मात्र, युद्धाला संपवणे सहज सोपे नाही. कारण सत्ताबदल करण्यासाठी जमीनीवर सैन्य पाठवावे लागणार आहे, जे अमेरिकेसाठी रिस्की असू शकते असेही जॉन बाल्टन यांनी म्हटले आहे.

ओमानचे परराष्ट्र मंत्री अलबुसैदी यांनी एका लेखात अमेरिकेला तातडीने युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी हे युद्ध भले केव्हाही संपले तरी यात कोणालाही विजय मिळू शकत नाही. उलट संपूर्ण जगावर याचा परिणाम होऊ शकतो. ओमान युद्धाआधी इराण आणि अमेरिकेत युद्ध होऊ नये यासाठी प्रयत्न करत होता.

Follow Us
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर