पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची पुन्हा जेलमध्ये रवानगी, त्या सहा तासांमध्ये नेमकं काय घडलं?

इमरान खान यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु अवघ्या सहा तासांमध्येच त्यांना पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची पुन्हा जेलमध्ये रवानगी, त्या सहा तासांमध्ये नेमकं काय घडलं?
imran khan
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 21, 2026 | 11:49 AM

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारानंतर त्यांना पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. गुरुवारी मध्यरात्री एक वाजता त्यांना उपचारासाठी शिफा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र अवघ्या सहा तासांमध्येच पुन्हा एकदा त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. त्यांना पुन्हा एकदा अदियाला जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. शहबाज शरीफ सरकारने शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची रवानगी इस्लामाबादच्या शिफा हॉस्पिटलमधून अदियाला जेलमध्ये केली आहे.

इमरान खान यांना शुक्रवारी रावळपिंडीमधून उपचारासाठी इस्लामाबादमध्ये असलेल्या शिफा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांना अवघ्या काही तासांमध्येच पुन्हा एकदा अदियाला जेलमध्ये नेण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जेव्हा इमरान खान रुग्णालयात होते, तेव्हा या रुग्णालयाभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. इमरान खान यांना रुग्णालयात उपचार मिळावेत यासाठी त्यांच्या वकिलाकडून कोर्टात धाव घेण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने इमरान खान यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश सरकारला दिले होते. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार इमरान खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

परंतु उपचारानंतर अवघ्या सहा तासांमध्येच त्यांची रवानगी पुन्हा एकदा जेलमध्ये करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इमरान खान यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिथे त्यांच्या उपचारासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. एक डॉक्टरांची टीम सज्ज ठेवण्यात आली होती, उपचारानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्यांची पुन्हा एकदा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. जेलमध्ये इमरान यांना भेटू दिलं जात नसल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे. सुरक्षेचं कारण सांगून पोलीस इमरान खान आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट टाळत आहेत. तसेच इमरान खान सध्या ज्या जेलमध्ये आहेत, तिथे देखील तगडा पोलीसबंदोबस्त लावण्यात आला आहे. इमरान खान यांचा तुरुगात छळ सुरू असल्याचा आरोप त्यांच्या नातवाईकांकडून करण्यात आला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us