जगातील ‘या’ 5 शक्तीशाली नेत्यांना सुनावलेला मृत्यूदंड; एकाला तर थेट उलटं लटकवलं

बांगलादेशचे जनक म्हणून ओळखले जाणारे शेख मुजीबूर रहमान यांच्या कन्या आणि बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परंतु शेख हसीना या मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या पहिल्याच राजकारणी नाहीत. याआधीही हुकूमशहा आणि राजकारण्यांना मृत्यूदंड सुनावण्यात आला होता.

जगातील या 5 शक्तीशाली नेत्यांना सुनावलेला मृत्यूदंड; एकाला तर थेट उलटं लटकवलं
शेख हसीनाच नव्हे तर यांनाही सुनावण्यात आलेला मृत्यूदंड
Image Credit source: Instagram
Updated on: Nov 28, 2025 | 8:24 PM

बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान मानवतेविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांसाठी बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना सोमवारी तिथल्या विशेष लवादाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. शेख हसीना यांच्यासोबतच बांगलादेशचे माजी गृहमंत्री असदुज्जमाँ खान यांनाही मृत्यूदंड सुनावण्यात आला. या दोघांच्याही अनुपस्थितीत लवादासमोर सुनावणी झाली. आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादासमोर (आयसीटी) हसीना यांच्यावरील आरोपांवर गेल्या अनेक महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. विद्यार्थी आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या शेकडो निदर्शकांमागे हसीना याच मुख्य सूत्रधान होत्या आणि त्यांचंच हे सर्व नियोजन होतं, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसक विद्यार्थी आंदोलनानंतर शेख हसीना 5 ऑगस्ट रोजी भारतात पळून आल्या. तेव्हापासून त्या भारतामध्ये राहत आहेत. तर बांगलादेशमधील न्यायालयाने त्यांना फरारी घोषित केलं आहे. हा निकाल दक्षिण आशियाच्या राजकीय इतिहासातील धक्कादायक आहे. असं असलं तरी बांगलादेश आणि पाकिस्तान यांचा इतिहास पाहता याआधीही अनेक नेत्यांना मृत्यूदंड सुनावण्यात आला होता. बांगलादेशचे जनक म्हणून...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा